संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 1:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एकाल नऊ वर्षीय शालेय विद्यार्थी त्याच्या राहत्या घर परीसरातील कुंभारे कॉलोनीतून बेपत्ता होण्याच्या चर्चेला विराम मिळत नाही तोच आज विकतु बाबा नगर परिसरातील एक 14 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना आज निदर्शनास आली. यासंदर्भात बेपत्ता 14 वर्षोय मुलीच्या आजीने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सदर दोन्ही घटनेला गांभीर्याने घेतले असून दोन्ही बेपत्ता झालेल्याच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा जोमाने कामाला लागले असून जागोजागी असलेले सीसीटीव्ही फुटेज जमा करीत तर्कशक्तीचा सुद्धा वापर करण्यात येत आहे.