संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान पोलीस व वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षकांची कारवाई.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उतरेस ०४ किमी अंतरावर टेकाडी शेत शिवारात वेकोलि कामठी उपक्षे त्र अंतर्गत खुली खदान चा कोळसा चोरून तीन आरो पींने अवैधरित्या टालवर साठवनुक केल्याचे कन्हान पोलीसाना मिळुन आल्याने वेकोलि सुरक्षा अधिका-या स बोलावुन १४ टन कोळसा किंमत ५६ हजार रूपया चा कोळसा जप्त करून कन्हान पोलीसांनी फिर्यादी वेकोलि सुरक्षा अधिकारी यांच्या तक्रारीने तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरो पीचा शोध घेत आहे.
प्राप्त माहिती नुसार गुरूवार (दि.९) जुन ला सायंकाळी ६ वा. ते ७ वाजता दरम्यान कन्हान पोलीस स्टेशनचे पो हवा राहुल रंगारी यांनी वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी रविकांत रामदास कंडे यांना फोन करून माहीती दिल्याने सुरक्षा अधिकारी आप ल्या सुरक्षा रक्षकासह घटनास्थळी पोहचले असता आरोपीतांनी संगणमत करून टेकाडी शिवारात अवैद्य रित्या टाल वर वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत खुली कोळसा खदान चा चोरी केलेला कोळसा झाडी झुडपा त साठवुन ठेवलेला मिळुन आल्याने जप्त करून ट्रक मध्ये भरून वेकोलिच्या वजन काटयावर त्याचे १४ टन वजन करून दगडी कोळसा किंमत ५६,००० रूपया चा मुद्देमाल कोळसा डेपो मध्ये जमा करून कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसानी आरोपी १) भुजंग महल्ले वय ४८ वर्ष २) सुरेंद्र बुधे वय ३५ वर्ष ३) बंटी भुते वय ३० वर्ष तिघेही राह. टेकाडी यांंचे विरुद्ध कलम ३७९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान अपराध पोलीस निरिक्षक विनायक कदम यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोस्टे चे सपोनि सतिश मेश्राम हे पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे. यात विशेष टेकाडी ग्रा प उपसरपंच चे पति सुरेंद्र बुधे हे सुध्दा कोळसा चोरीत लिप्त असल्याने त्याचे वर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.