सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 131 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. सोमवार (ता. 06) रोजी उपद्रव शोध पथकाने 131 प्रकरणांची नोंद करून 70 हजार 700 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 50 प्रकरणांची नोंद करून 20 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 06 प्रकरणांची नोंद करून 600 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून 4400 रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 4 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 14 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे प्रथम अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 36 प्रकरणांची नोंद करून 7 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 14 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 03 प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सोमवार (ता. 06) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत मदर स्वीट्स ‍टिमकी मोमीनपुरा, सतरंजीपुरा झोन अंतर्गत गजभिये किराणा शॉप रानी दुरगावती चौक, शाहु किराणा स्टोर्स भांडेवाडी तीन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 15 हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत झोन अंतर्गत वैद्यकीय योग्य प्रकारे विलग केला जात नसल्याने आणि सामान्य कचऱ्यात मिळत जात असल्यास 1 प्रकरणांची नोंद करुन 5 हजार रुपयांची दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत तारा बिल्डाकॅन ढाबा, नेहरुनगर झोन अंतर्गत श्रीशा हाईट्स डायमंड नगर दिघोरी 2 प्रकरणांची नोंद करून एकुण 20 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत मुनीर नजीर शेख यांच्यावर सीवर चेंबर तोडण्यासाठी 10 हजारांचा दंड लावण्यात आला तसेच पाईप लाईन साठी सर्विस रोड तोडल्याबद्दल मीरा राकेश सिंह ठाकुर यांच्यावर 10 हजारांचा दंड लावण्यात आला. असे एकूण 09 प्रकरणाची नोंद करून 65 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

Tue May 7 , 2024
मुंबई :- मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर झालेल्या सुनावणीनंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने अजमल कसाबचे फाशीच्या शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळताना कसाब ने आपणच हेमंत करकरे यांच्यासह तीन पोलीस अधिकाऱ्यांना ठार केल्याच्या कबुलीजबाबाचा विशेष उल्लेखही केला होता. असे असतानाही ” हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाब ची नव्हती, ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com