१३ फेब्रुवारीला बसपाची ‘बहुजन चेतना सभा’ बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांची माहिती

मुंबई – राज्यात बहुजनांचा आवाज बुलंद करीत त्यांना नेतृत्वाची योग्य संधी मिळावी या उद्देशाने बहुजन समाज पार्टीच्या वतीने येत्या १३ फेब्रुवारी २०२२ रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा.सुश्री.बहन मायावती जी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर येथील ‘चिटणीस पार्क’ मैदानात भव्य ‘बहुजन चेतना सभे’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी मंगळवारी दिली. सभेत बसपाचे राष्ट्रीय समन्वयक मा.आनंद आकाश साहेब, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद कुमार जी, राष्ट्रीय समन्वयक मा.खासदार रामजी गौतम साहेब, प्रदेश प्रभारी प्रमोद रैना प्रामुख्याने उपस्थित राहतील. राज्यभरातील कार्यकर्ते,पदाधिकारी लाखोंच्या संख्येत सभेला हजर राहणार असल्याचे देखील ते म्हणाले.

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षण संकटात आले आहे.अशात ओबीसींसह बहुजनांचे राजकीय प्रतिनिधित्व धोक्यात आले आहे. पंरतु, बसपा हे होवू देणार नाही. बसपाच्या आग्रही भूमिकेनंतरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.केवळ बहुजनांच्या उद्धारासाठीच बसपाचा जन्म झाला असून अखेरपर्यंत पार्टी त्यांच्यासाठी लढत राहील.बहुजन चेतनेसाठी ही सभा बरीच महत्वाची ठरणार असल्याचे देखील अँड.ताजने म्हणाले. राज्यभरातील पालिकांमध्ये बसपाचे महापौर बनवण्याच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. बसपा त्यामुळे मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे ते म्हणाले.

कार्यकर्त्यांमधूनच सभागृहाला नेतृत्व मिळेल-मा.गौतम

नुकतीच पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक मा.खासदार रामजी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भस्तीय बैठक पार पडली.या बैठकीतून गौतम यांनी पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेतला. नागपूर महानगर पालिकेत बसपाचा निळा झेंडा फडकवण्यासाठी तयारीला लागण्याचे निर्देश त्यांनी कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांना दिले. पक्षाच्या विचारधारेला बळ देवून पक्ष विस्तारासाठी कार्यरत प्रत्येक कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करवून दिली जाईल. शिवाय कार्यकर्त्यांमधूनच सभागृहात नेतृत्व जाईल, याची पक्ष काळजी घेणार असल्याचे आश्वासन गौतम यांनी दिले.

—-

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कोयला तस्करी और बिजली चोरी से सरकार का दिवाला निकला ?

Wed Dec 29 , 2021
नागपुर – कोयला संकट को लेकर लगातार आ रही रिपोर्टों के बीच केंद्र सरकार ने राज्य सरकारों को चेतावनी देते हुए कहा है कि वे खुले बाज़ारों में बिजली न बेचेंl केंद्र सरकार की ओर से कहा गया है कि अगर बढ़ती हुई क़ीमतों का राज्यों ने फ़ायदा उठाने की कोशिश की तो केंद्र की तरफ़ से की जाने वाली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com