बारावी नापास खासदारांचे गणितच कच्चे मनाची नाहीच, जनाची तरी ठेवा: एडतकर

अमरावती :- महामानवांच्या अवमानाच्या विरुद्ध शनिवारी मुंबईत निघालेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला दोन लाखापेक्षा जास्त गर्दी असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीच्या या मोर्चात अवघे तीन हजार लोक सामील होते असे बालिश विधान गरज नसताना केले आहे. खासदार नवनीत राणा यांचे वक्तव्य मुळीच आश्चर्यकारक नसून बारावी नापास नवनीत राणा यांचे गणित सुरुवातीपासूनच कच्चे असल्याने त्यांना मोर्चात सामील असलेल्यांची योग्य ती शिरगणती करता आली नाही, असा टोला प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी लगावला आहे.

खरं तर महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा आणि खासदार नवनीत राणा यांचा दुरांन्वयेही संबंध नसल्याने त्यांनी या विषयात नाक खुपसण्याचे कारण नव्हते. भाजप किंवा त्यांच्या समर्थकांनी मोर्चाच्या संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे स्वाभाविक आहे तथापि काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मेहरबानीने निवडून आलेल्या अपक्ष खासदारांने हास्यास्पद विधान करून आपला बालिशपणाच जाहीर केला आहे. भाजपची गुलामगिरी करतांनाच, जात चोर भाजप दत्तक खासदाराने आपल्या मालकांना खुश करण्यासाठी चक्क महाविकास आघाडीचा मोर्चा तीन हजारावर आणून ठेवणे हास्यास्पद आहे. खासदार नवनीत राणा यांनी आता भाजपची चमचेगिरी करण्यासाठी अपक्ष न राहता थेट भाजपमध्ये प्रवेश करावा असे एडतकर यांनी म्हटले आहे. बारावी नापास आणि कच्चे गणित असल्यामुळे नवनीत राणांचा मोर्चाचा आकडा चुकणे स्वाभाविक असून त्यांनी किमान गणित चांगले असलेले पदवीधर मोर्च्यातील संख्या मोजण्यासाठी ठेवले असते तर बरे झाले असते असेही दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.

खासदार नवनीत राणा यांची नेहमीच दुटप्पी आणि दुतोंडी भूमिका राहत आली आहे, पठाण चित्रपटात भगवे वस्त्र धारण केल्यामुळे जो वाद उत्पन्न झाला आहे त्याचा निषेध नवनीत राणा यांनी केला आहे सिने सृष्टी देशाला आर्थिक मदत करते त्यामुळे त्यांना विरोध करू नये असे आवाहनही नवनीत राणा यांनी केले आहे. सिनेसृष्टी देशाला आर्थिक मदत करते हा भंपक शोध सुद्धा नवनीत राणा यांनी लावला आहे. चित्रपटात भगवा धारण करून करण्यावरून नवनीत राणा यांनी नाराजी व्यक्त केली आहे परंतु याच नवनीत राणा यांनी त्यांच्या टूकार चित्रपटात यापूर्वी भगवे वस्त्र धारण करून बेभान नाच केला आहे हे त्या सोईस्कर विसरतात. त्यामुळे वेळोवेळी सोयीनुसार आपल्या भूमिका बदलणाऱ्या खासदारांनी आपण यापूर्वी काय बोललो आणि कसे वागलो? याचा मागोवा घेऊन बोलावे अशी टीका करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणारी वक्तव्य भाजपच्या भामट्यांनी केली तेव्हा मात्र खासदार बाईंची तोंड उघडले नव्हते याकडेही दिलीप एडतकर यांनी लक्ष वेधले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

GST परिषद की बैठक शुरू

Mon Dec 19 , 2022
– गड़बड़ियों को अपराध की श्रेणी से बाहर और टैक्स चोरी रोकने पर होगा विचार नागपुर :- माल एवं सेवा कर (GST) की नीति-निर्धारक इकाई GST परिषद की अहम बैठक शनिवार को शुरू हो गई। इस बैठक में GST कानून के तहत गड़बड़ियों को अपराध की श्रेणी से बाहर करने पर विचार होने की संभावना है। बैठक के एजेंडे में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com