मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत राज्यात चार लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात 123 कोटी रुपये अनुदान वर्ग

मुंबई :- राज्यातील ६५ वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धावस्थेत मदत करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदीसाठी, मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत दि.१४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यातील आधार प्रमाणीकरण झालेल्या ४ लाख १२ हजार ११३ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीव्दारे प्रति लाभार्थी तीन हजार प्रमाणे १२३.६३ कोटी रुपये अनुदान वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ९ ऑक्टोबर २०२४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील ४० हजार २२० पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीव्दारे निधी वर्ग करुन करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत राज्यात १७ लाख ८३ हजार १७५ ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज प्राप्त आहेत. या अर्जाची छाननी व आधार प्रमाणीकरणाचे काम सुरु आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुधीर मुनगंटीवार के हस्ते पियाली बिस्वास सम्मानित

Tue Oct 15 , 2024
बल्लारपूर :-नवरात्री के दौरान बल्लारपूर में सुधीर मुनगंटीवार की संकल्पना से साकार व भाजपा बल्लारपूर द्वारा आयोजित कमल दांडिया स्पर्धा २०२४ में पियाली बिस्वास ने अपने बॅनर संस्कृति इवेंट्स के माध्यम से नागपूर शहर के बेहतरीन कलाकारो के साथ प्रस्तुति दी । स्पर्धा को स्पर्धको का अभूतपूर्व प्रतिसाद मिला । बल्लारपूर के दर्शको ने पहली बार लाइव गरबा (गायक व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com