१२ ते १४ वर्ष वयोगटाच्या लसीकरणाला मिळणार गती

शाळांमध्ये होणार लसीकरण सत्र : विद्यार्थ्यांनो लसीकरणासाठी पुढे या

नागपूर : नागपूर शहरातील १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुले व मुलींचे कोव्हिड प्रतिबंधक कोर्बेव्हॅक्स लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात यासंदर्भात करावयाच्या कार्यवाही संबंधी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी आदेश निर्गमित केले आहे. आतापर्यंत २७५० मुलांनी लस घेतली आहे.

          मनपाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार १२ ते १४ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी शहरातील सर्व मनपा, शासकीय व खासगी शाळांमध्ये लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. शाळांमधील लसीकरण सत्रांसाठी मनपाद्वारे मोफत लससाठा, वैद्यकीय कर्मचारी, लस नोंदणी कर्मचारी, आवश्यक वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, औषधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शाळा व्यवस्थानाद्वारे संबंधित झोनल वैद्यकीय अधिकारी किंवा मनपाच्या आरोग्य अधिका-यांशी संपर्क साधून सोईनुसार लसीकरण सत्र निश्चित करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.  

          १६ मार्च पासून १२ ते १४ वर्ष वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या वयोगटासाठी केवळ कोर्बेव्हॅक्स लसीचाच वापर करणे अनिवार्य आहे. २००८, २००९ आणि १५ मार्च २०१० पर्यंत जन्मलेली बालके या लसीकरणासाठी पात्र आहेत. लसीकरण केंद्रांवर जाताना बालकांना नोंदणीकरीता शाळेचे विद्यार्थी ओळखपत्र, आधारकार्ड किंवा पासपोर्ट सोबत ठेवणे आवश्यक आहे.

          कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी झालेले असले तरी धोका मात्र टळलेला नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी मनपाद्वारे हे महत्वाचे पाउल उचलण्यात आले आहे. यासाठी १२ ते १४ वर्ष वयोगटाच्या सर्व बालकांनी पुढे येउन लवकरात लवकर आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

३१ मार्चपर्यंत एकमुस्त वापरशुल्क भरणाऱ्या परवानेधारकांना मिळणार शास्तीमध्ये सूट

Thu Mar 24 , 2022
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या बाजार विभागांतर्गत येणाऱ्या परवाने धारकांद्वारे येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत थकीत आणि चालू वर्षाचे वापरशुल्क एकमुस्त भरल्यास त्यांना शास्ती मध्ये सूट देण्याचा महत्वाचा निर्णय मनपाद्वारे घेण्यात आलेला आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार बाजार अधीक्षकांद्वारे यासंबंधी आदेश जारी करण्यात आले आहे.           मनपाच्या बाजार विभागा अंतर्गत येणारे दुकाने, ओटे किंवा जागांच्या वापरसाठी मनपाकडून वापरशुल्क आकारण्यात येते. हे वापरशुल्क वेळेवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com