तस्करी केले जात असलेले 11 किलो सोने आणि सिगारेट, विमानतळ आयुक्तालयाच्या मुंबई कस्टम झोन -III ने केलेल्या विविध कारवायांमध्ये प्रवाशांकडून जप्त,तीन जणांना अटक

मुंबई :- विमानतळ आयुक्तालयाच्या मुंबई कस्टम झोन -III ने 13 – 16 मे 2024 या कालावधीत मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या 27 कारवायांमध्ये 7.16 कोटी रुपये मूल्याचे 11.39 किलोहून अधिक सोने आणि सिगारेटी जप्त केल्या. मेणात लपवलेले सोन्याचे बारीक कण, कच्चे दागिने, रोडियम प्लेटेड पैंजणे आणि सोन्याच्या वड्या अशा विविध स्वरूपात जप्त केलेले सोने आढळले. सामानासोबत, गुदाशयात, बुरख्याखाली आणि प्रवाशांनी सोने परिधान करून ते विविध प्रकारे लपवून त्याची तस्करी केली जात होती. या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

क्वालालंपूरहून मुंबईकडे निघालेल्या एका परदेशी नागरिकाची तपासणी केली असता त्याच्याकडे हातातील कच्च्या सोन्याचा कडा, साखळी, पेंडंट, दोन अंगठ्या असे एकूण 1093.00 ग्रॅम वजनाचे लपवून ठेवलेले सोने सापडले. हे सर्व सोने 22 कॅरेट गुणवत्तेचे होते. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

जेद्दाह इथून मुंबईला येत असलेल्या दोन भारतीय नागरिकांची चौकशी केली असता त्यांच्याकडे 24 कॅरेट गुणवत्तेच्या, 999.000 ग्रॅम वजनाच्या कच्या सोन्याच्या बांगड्या (16 नग ) आढळून आल्या. हे सर्व सोने शरीरावर परिधान करून त्याची तस्करी केली जात होती. या दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

नैरोबीहून मुंबईला येत असलेल्या दोन परदेशी नागरिकांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे 523.00 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या वितळवलेल्या स्वरुपातल्या वड्या ( 07 नग) आढळल्या. हे सर्व सोने 24 कॅरेट गुणवत्तेचे होते. हे प्रवासी त्यांनी परिधान केलेल्या बुरखा आणि जॅकेटच्या खिशामध्ये लपवून या सोन्याची तस्करी करत होते. आणखी एका प्रकरणात 22 भारतीय नागरिकांची तपासणी करण्यात आली. या प्रवाशांमध्ये दुबई(10 व्यक्ती),अबू धाबी (03 व्यक्ती), जेद्दाह ( 01 व्यक्ती), कैरो ( 01 व्यक्ती), दोहा ( 01 व्यक्ती), हाँगकाँग (01 व्यक्ती), क्वालालंपूर (01 व्यक्ती), कुवैत (03 व्यक्ती )आणि मस्कत (01व्यक्ती) यांचा समावेश आहे. यात लपवलेले 8575 ग्रॅम सोने आढळले. हे सगळे सोने अंतर्वस्त्रांमध्ये, बुरख्याखाली, जीन्सच्या खिशात, गुदाशयात आणि अंगावर परिधान करून त्याची तस्करी केली जात होती.आणखी एका वेगळ्या प्रकरणात अबू धाबीहून प्रवास करत असलेल्या एका भारतीय नागरिकाची चौकशी केली असता तो मेणात (01 नग) कणांच्या स्वरूपात लपवलेल्या सोन्याची तस्करी करत असल्याचे आढळले. हे सर्व कण 197.000 ग्रॅम इतक्या वजनाचे असून, ते 24 कॅरेट गुणवत्तेचे आहेत. यासोबतच या प्रवाशाकडे पाकिटावर चित्राच्या स्वरुपात इशारा लिहिलेल्या गोल्ड फ्लेक या सिगारेटच्या 12860 काड्या सामानात लपवलेल्या आढळल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कान फिल्म महोत्‍सव में आकर्षण का केंद्र बना भारत पर्व का जश्न

Sat May 18 , 2024
– वैश्विक मंच पर भारतीय संस्कृति, व्यंजन और सिनेमा को प्रदिर्शत करने वाली संध्‍या में 250 से अधिक प्रतिनिधि शामिल हुए – 55वें भारतीय अंतर्राष्ट्रीय फिल्म महोत्सव के पोस्टर का अनावरण मुंबई :- सिनेमा के सबसे भव्य उत्सव 77वें कान फिल्म महोत्‍सव का दो दिन पहले शुभारंभ हुआ। कॉन्‍टेंट और ग्लैमर के संगम से युक्‍त यह दस दिवसीय रंगारंग उत्सव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!