– शासनाने १० % टक्के व्हॅट डबल केल्यामुळे परमिटधारक रस्त्यावर उतरणार !
– येत्या 16 नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चा काढण्याचा इशारा
– नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशन द्वारा जिल्ह्यातील रेस्टॉरंट परमिटरूम येत्या 16 नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय – राजीव जयस्वाल
नागपूर :- जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशन यांच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील रेस्टॉरंट परमिटरूम गुरुवार दि. 16 नोव्हेंबर 2023 रोजी, बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन त्याच दिवशी सकाळी 11 वाजता. संविधान चौक येथे निषेध सभा आणि त्यानंतर नागपूर जिल्हा परमिटधारक आणि त्यात काम करणारे कर्मचारी, भव्य मोर्चाच्या रूपात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याची माहिती यावेळी दिली. शासनाने परमिट रूमवर लावलेला १० % टक्के व्हॅट टॅक्स हा हटवून उत्पादन स्तोत्रावर लावण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे. जर यानंतरही शासन /प्रशासन यांनी दखल घेतली नाही तर अधिवेशन काळात भव्य मोर्चा काढून संपूर्ण महाराष्ट्रात परमिटरूम बंद करू ? असे पत्रकार परिषदेमध्ये राजीव जयस्वाल यांनी पत्रकारांना सांगितले.