संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 24:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी नागपूर महामार्गावरील भाटिया लॉन येथे आयोजित भाचीच्या लग्न समारंभात सहभागी झालेंल्या फिर्यादी महिलेची नजर चुकवून कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी महिलेच्या सोनेरी रंगाच्या पर्समधून सोन्याचे व आर्टिफिशियल दागिने व एप्पल कंपनीचा एअर पॉड,डेबिट कार्ड व नगदी 10 हजार रुपये असा एकूण 1 लक्ष चार हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना 22 डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता घडली असून यासंदर्भात फिर्यादी महिला अर्चना संदीप डोंगरे वय 45 वर्षे रा कमाल चौक नागपूर ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे करीत आहेत.