नागपूर :-पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष पोद्दार (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात नागपूर ग्रामीण जिल्हयात प्रत्येक उपविभागीय स्तरावर महिलांच्या व मुलींचे छेडछाडी करणाऱ्या टवाळखोरांविरूद्ध कठोर कार्यवाही साठी दामिनी पथक पुर्ननियुक्त स्थापन केले असुन सदर पथक हे शाळा, कॉलेज गर्दीचे ठिकाण, बस स्टैंड तसेच इतर महत्त्वाचे ठिकाणी महिलांशी हुल्लडबाजी व छेडछाड करणान्यांवर विशेष लक्ष ठेवून त्यांच्याविरूद्ध कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता एकुण ०६ दामिनी पथके स्थापन केले असून प्रत्येक विभागानुसार महिला पोलीस अधिकारी दामिनी पथकाच्या प्रमुख म्हणुन नेमण्यात आले आहे.
ते पुढीलप्रमाणे १) रामटेक उपविभागीय दामिनी पथक प्रमुख सपोनि येवले, मो. नं. ९०११६५५२८४
२) सावनेर उपविभागीय दामिनी पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक मोकासे, मो. नं. ८३८०८५०३५०
३) कन्हान उपविभागीय दामिनी पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक भुते, मो. नं. ८८२२५६६१८०
४) उमरेड उपविभागीय दामिनी पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सुचिता मंडावले, मो. नं. ९७६३२३४५४८
५) काटोल उपविभागीय दामिनी पथक प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक पुनम कोरडे, मो. नं. ७२७६६३०४५५
६) नागपूर उपविभागीय दामिनी पथक प्रमुख महिला पोलीस हवालदार पुनम देव्हारे मो. नं. ८७८८७९०८५८ असे असुन या व्यतिरीक्त प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर देखील दामिनी पथक असून कोणत्याही महिला व मुलींशी हुल्लडबाजी व छेडछाडी करील त्यावेळी वरील मोबाईल क्रमांकावर फोन केल्यास तात्काळ पथक पटनास्थळी हजर होवुन सदर इसमांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच सदरचे दामिनी पथक हे विभागीय स्तरावर व पोलीस स्टेशन स्तरावर पेट्रोलॉग व्दारे छेडछाडी व हुल्लडबाजी करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी लक्ष ठेवुन आहेत.