महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य महिला आयोग नेहमीच अग्रेसर  – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

-महिलांची सुरक्षा ही समाजाची जबाबदारी – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 मुंबईदि. 25 : महिला आयोग महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या अडचणी सोडविण्याचा नेहमीच प्रयत्न करते. महिलांचे अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी विविध कायदे आहेत. महिलांना उदभवणा-या कौटुंबिक समस्या व त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात त्यांना वेळोवेळी समुपदेशन व कायदेविषयक मार्गदर्शनासाठी महिला आयोग नेहमीच महिलांच्या पाठिशी असतोअसे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती  ठाकूर यांनी केले.

            लैगिक भेदभाव नष्ट करून समानता प्रस्थापित करणेतसेच सामाजिकघरगुती अन्याय व अत्याचार यांच्याविरुद्ध कठोर कायदे व उपाययोजना करणेत्याचबरोबर महिलांना शारीरिकसामाजिकआर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविणे ही समाजाची जबाबदारी आहेअसे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

            राज्य महिला आयोगाच्या स्थापनेस 29 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने  यशवंतराव चव्हाण केंद्रातील रंगस्वर सभागृहात‘ वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळेमहिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरेमहिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,पोलीस महासंचालक संजय पांडेमहिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटीलमाविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी आदी उपस्थित होते.

            महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्यामहिला आणि बालकांच्या सशक्तीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तीन टक्के निधी कायमस्वरूपी महिला व बालविकास विभागाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहेयाद्वारे महिला आणि बालकांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न आहे.महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महिला बचतगट मोहिमेचे बळकटीकरण करणे व महिला बचत गट भवन निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नविन सर्वसमावेशक महिला धोरण लवकरच येणार असून

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे शासनाचे ध्येय आहे. नोकरीव्यवसाय करणारी स्त्री स्वत:च्या पायावर उभी असते मात्र ग्रामीण महिला तसेच गृहिणींनाही आर्थिक समस्या भेडसावतात. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उभी राहिलेली बचत गटांची चळवळ निश्चितच महिलांना संघटित होऊन आर्थिक समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. समाजामध्ये सकारात्मक बाबी घडत असतानाच काही विकृतीदेखील दिसून येतात. बलात्कारकौटुंबिक हिंसाचारॲसिड हल्ला अशा घटना घडतात.अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस दल नेहमी तत्पर असते. मात्रसमाज म्हणून आपण सर्वांनी अशा घटनांबाबत चिंतन केले पाहिजेअसेही ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

            उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती फौजदारी कायदे सुधारणा‘ विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. एकल महिलांबाबत धोरणात्मक निर्णय घेणेआत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पत्नींना ओळखपत्र यासारख्या विविध मागण्या आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणा-या महिला आर्थिक विकास महामंडळराज्य महिला आयोग यांना निधी द्यावा. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र देण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2020 ते 2030 ही दहा वर्ष डिकेड ऑफ ॲक्शन’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे शाश्‍वत विकासासाठी कृती करायची आहे.महिलांना त्यांचे प्रश्न कुठे मांडायचे याची माहिती झाली पाहिजे. प्रत्येक कार्यालयात महिलांसाठी स्वच्छतागृह असले पाहिजे. राज्य महिला आयोगाने समुपदेशन केंद्र सुरू करावे,असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

            खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्यामहाराष्ट्रात समाजकारणात व राजकारणात महिलांचे मोठे योगदान आहे. पूर्वीच्या काळी महिलांना समान अधिकार मिळत नव्हते. कोणत्याही सामाजिक परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातूनच होते. जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तीन टक्के निधी कायमस्वरूपी देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.

            महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यावेळी महिलांच्या सुरक्षासमस्या व सुविधांसाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथकभरोसा सेलदामिनी पथकविशाखा पथकभरारी पथकबिट मार्शल यांची माहिती दिली.

            या कार्यक्रमात राज्यभरातील महिलांसाठी टोल फ्री 155209 क्रमांकाचे तसेच महिला आयोगाने तयार केलेल्या कॅलेंडर व डायरीचे देखील अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महिलांसाठीचा हा टोल फ्री क्रमांक लवकरच कार्यान्वित होणार असल्याची  माहिती यावेळी देण्यात आली.

            या कार्यक्रमास महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा  श्रीमती प्रियांका सावंतश्रीमती निर्मला सामंत-प्रभावळकरमहिला आयोगाच्या माजी सदस्य सचिव अ.ना. त्रिपाठी,तसेच महिला आयोगाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तर आभार दीपा ठाकूर यांनी मानले.

 

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

हिला सक्षमीकरणासाठीच्या योजनांना मिळणार ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य  - महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Tue Jan 25 , 2022
 मुंबई, दि. 25 :- महिलांचे आर्थिक, सामाजिक सक्षमीकरण करणे, त्यांना दर्जा आणि संधीची समानता उपलब्ध करुन देण्यासाठी महिला व बालविकास विभाग विविध उपक्रम राबविते. हे उपक्रम राबविण्यासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळणार आहे,असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती  ठाकूर यांनी सांगितले.             ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन यांनी महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com