संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 29: – दारिद्र्याचे चटके सोसत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या कामठी शहरातील हातमाग विणकर बांधवांना हक्काचे घर मिळावे यासाठी राज्याचे तत्कालीन वस्त्रोद्योग आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री मोहम्मद आरिफ नसिम खान यांनी नवीन कामठी भागात 346 भूखंड उपलब्ध करून देण्याचे निर्देश यांनी म्हाडाला दिले होते आज मात्र जवळपास 17 वर्षाचा कालावधी लोटून गेला मात्र या विणकरांना अजूनही हक्काचे घर मिळू शकली नाही हे एक शोकांतिकाच म्हणावे लागेल….तर मागच्या काही महिन्यांपूर्वी नवीन कामठी परिसरातील भोयर कॉलेज च्या बाजूच्या मोकळ्या जागेत असलेल्या म्हाडाच्या जागेची रीतसर मोजणी करण्यात आली त्या जागेत येत असलेले भोयर कॉलेजतर्फे करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यात आले तसेच नगर परिषद तर्फे बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालय तोडून तारांचे कुंपण करण्यात आले तेव्हा आता या जागेत म्हाडा तर्फे भूखंड वितरित होणार असे अपेक्षित होते मात्र त्यानंतर त्या कामाला कुठलेही गती न आल्याने त्या जागेत पुन्हा पूर्वीसारखी जैसे थे…ची स्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे या जागेतील वितरित होणाऱ्या भूखंड वाटपाचा विषय अजूनही अधांतरी आहे.
यानुसार विणकरांना नवीन कामठी भागातील सर्व्हे नंबर 36/10,सर्व्हे नंबर 23/बी येथे 154 भूखंड आणी सर्व्हे नं 33/सी येथे 192 असे एकूण 346 भूखंड कामठी येथील हातमाग विणकरांना नाममात्र शासकीय दरात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता .उर्वरित हातमाग विणकरांना टप्प्याटप्प्याने भूखंड उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले होते मात्र अजूनही या अपेक्षित हातमाग विनकराणा मंजूर झालेंल्या भूखंड मधून निवाऱ्यांची सोय होऊ शकली नाही.
-विणकरांची क्रेडिट कार्ड चो योजना हवेतच विरली
……विंणकरांच्या व्यवसायाला आर्थिक बळ मिळावे यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने विणकरांना खास क्रेडिट कार्ड देण्याची योजना 11 वर्षांपूर्वी आखली होती यानुसार केंद्र सरकारच्या तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्रालय च्या वतीने 4 नोव्हेंबर 2011 रोजी विणकरांसाठी खास क्रेडिट कार्ड योजना लागू केली होती .या योजने अंतर्गत क्रेडिट कार्ड प्राप्त झालेल्या विणकरांना 2 लक्ष रुपया पर्यंत कर्ज उपलब्ध होणार होते यात 20 टक्के कर्जाचा वाटा विणकरांना उचलायचा होता .त्यातही 25 हजार पर्यंतचे कर्ज प्राप्त करण्यासाठी विणकरांना स्वतःचे भांडवल गुंतविण्याची गरज नाही असे अनेक लाभ या क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून विणकरांना प्राप्त होणार होते मात्र ही क्रेडिट कार्ड योजना हवेतच विरली असून ही योजना केवळ कागदावरच दिसून येते.