संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-आनंद नगर परिसराला फटका गृहपयोगी वस्तू अन्नधान्य भिजले
कामठी ता प्र ११ जुलै – शहराला रविवार दिनांक 10 जुलैला मुसळधार पावसाने सर्वत्र झोडपून काढले यामुळे सर्वत्र पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.
या पावसाचा सर्वाधिक फटका नवी कामठी भागातील आनंदनगर, रामगड, शिवनगर, विकतूबाबा नगर,सैलाब नगर,समता नगर परिसराला बसला अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने गृहउपयोगी वस्तू व अन्नधान्य भिजल्याने नुकसान झाले.
कामठी शहरात रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली अर्धा एक तास झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः शहराला झोडपले शहरातील नाले दुथडी भरून वाहू लागले आनंदनगर, रामगड, शिवनगर, विक्तुबाबा नगर,सैलाब नगर आणि समता नगर परिसरातील रस्ते जलमय झाले होते रस्त्यावर साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग न मिळाल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे गृहपयोगी वस्तू व अन्नधान्य भिजुन नागरिकांचे नुकसान झाले आहे.
नागरी सुविधा समिती चे अध्यक्ष उज्ज्वल रायबोले यांनी तहसीलदार अक्षय पोयाम यांना संपर्क करून झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.