प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी होणार १६ जुलैला प्रसिद्ध

राज्य निवडणूक आयोगाद्वारे सुधारित तारीख जारी

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी ९ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र तक्रारींची संख्या आणि त्याचे समाधान करण्याच्या दृष्टीने या तारखेत बदल करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाद्वारे गुरूवार १६ जुलै २०२२ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासंबंधी राज्य निवडणूक आयोगाचे पत्र नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाले असल्याची माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिली आहे.

            राज्य निवडणूक आयोगाद्वारे नागपूर, बृहन्मुंबई, वसई विरार, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण डोबिंवली, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर नाशिक, अकोला व अमरावती या १४ महानगरपालिकांची अंतिम मतदार यादी ९ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. परंतु या महानगरपालिकांकडे प्राप्त झालेल्या हरकतींची संख्या मोठया प्रमाणात असल्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करून हरकतींचा निपटारा करणे गरजेचे आहे असे आयोगाच्या निर्दशनास आले आहे. त्यामुळे सदर १४ महानगरपालिकांकरीता प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी दि. ९ जुलै २०२२ ऐवजी १६ जुलै, २०२२ रोजी  प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नैसर्गिक आपत्तीत जीवित हानी होणार नाही यासाठी समन्वयाने काम करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Thu Jul 7 , 2022
ठाणे,  (जिमाका) : नैसर्गिक आपत्तीत जीवित हानी होणार नाही यासाठी यंत्रणांनी समन्वयातून तातडीने मदत व बचावकार्य हाती घ्यावे. जिल्हा प्रशासनातील विभागांनी सतर्क राहून आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सज्ज रहावे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, महापालिकांनी त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.   ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ठाणे जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी […]
eknath

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!