तिडके महाविद्यालयात मतदान नोंदणी शिबिराचे उद्घाटन
रामटेक : श्री. नरेंद्र तिडके महाविद्यालयं रामटेक येथील
या मतदान नोंदणी शिबिराचे उद्घाटन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले. यानिमित्ताने राबवण्यात येणाऱ्या सप्ताहास त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
आपल्या उद्घाटनपर भाषणातून तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी संविधान दिनाची आठवण करुन देत संविधान निर्मिती करतांना ज्यांनी परिश्रम घेतले ते लक्षात ठेवून राष्ट्र विकासात जबाबदार नागरिक म्हणून हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले.ऑनलाइन,ऑफलाइन मतदान नोंदणी करतानी कोणत्या अडचणी येऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती दिली. 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सध्या ऑनलाईन व ऑफलाईन मतदान नोंदणी सुरू आहे.मतदान नोंदणी करिता महाविद्यालयात शिबिर सुरू आहे इथे किंवा तालुका कार्यालयात तात्काळ मतदान नोंदणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी मतदान नोंदणी व मतदार जागृती याकरिता विद्यार्थ्यांना तहसील कार्यालय रामटेक येथील नायब तहसीलदार पाटील यांनी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाकरीता महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संगीता टक्कामोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या गावातील 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींचे मतदान नोंदणी करीता पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकांत भोवते यांनी केले तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा सुनील कठाने यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. बाळासाहेब लाड, प्रा. स्वप्नील मनघे, प्रा. अमरीश ठाकरे प्रा. नरेश आंबिलकर उपस्थित होते.