‘लसीकरण बंपर लकी ड्रॉ- २’ योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर,ता. १४ : कोविड लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘बंपर लकी ड्रॉ योजना भाग- २’ ची घोषणा महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केली होती. २८ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान लसीकरण करणारे सर्व पात्र वयोगटातील व्यक्ती मोठ्या संख्येने या योजनेत सहभागी होत आहेत. दरम्यान, आता या योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केली आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाची टक्केवारी वाढावी व नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दि. १२ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान घेण्यात आलेल्या ‘लसीकरण बंपर लकी ड्रॉ – १’ या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. यात लाखांवर व्यक्तीनी सहभाग घेऊन लसीकरण करून घेतले. तर लकी ड्रॉ मध्ये भाग्यवंत ठरलेल्या व्यक्तींना २६ जानेवारी रोजी बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. सदर उपक्रमास नागरिकांनाचा उत्तम प्रतिसाद लक्षात घेता लसीकरण बंपर लकी ड्रॉ योजना भाग- २ ची घोषणा करण्यात आली. यात १५ ते १७ वर्ष वयोगट आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी प्रिकॉशन डोस तसेच पहिला, दुसरा डोस घेणारे नागरिक मनपा हद्दीतील लसीकरण केंद्रावर लसीची मात्रा घेऊन सहभागी होत आहेत. या योजनेत भाग्यवान विजेत्यांना प्रथम बक्षीस फ्रिज, दुसरे बक्षीस वॉशिंग मशीन, तिसरे बक्षीस एलईडी टीव्ही आणि १० मिक्सर-ग्राइंडर प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येतील. यात अधिकाधिक नागरिकांना सहभाग घेता यावा, यासाठी  २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून, आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रभाग १३ मध्ये एसटीपी चे उद्घाटन

Mon Feb 14 , 2022
नागपूर –  प्रभाग क्र.१३, एन. आय. टी. गार्डन डागा ले-आऊट येथे नगरसेविका डॉ. परिणीता परिणय फुके यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाचे (STP) आज उद्घाटन नागपूरचे महापौर  दयाशंकर तिवारी जी व आमदार डॉ परिणयजी फुके यांच्या हस्ते करण्यात आले. नागपुर शहरात १२ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) नागपूर महानगर पालिकेद्वारे मंजूर करण्यात आलेले आहे. नगरसेविका डॉ.परिणीता फुके यांनी अथक प्रयत्न व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!