संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 08:-कामठी तालुक्यात एकूण 34 सेवा सहकारी संस्था कार्यरत असून यातील 27 सेवा सहकारी संस्थांचा पंचवार्षिक कार्यकाळ संपल्याने या संस्थेच्या पुढच्या पाचवर्षासाठी सेवा सहकारी संस्थांच्या संचालक पदाच्या निवडीसाठी नागपूर जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी ने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार या 27 सेवा सहकारी संस्थांची निवडणूक तीन टप्प्यात घेण्यात येत आहे.त्यातील पहिल्या टप्प्यातील 15 सेवा सहकारी संस्थांच्या संचालक पदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने या 15 सेवा सहकारी संस्थांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बिनविरोध निवड झालेल्या या 15 सेवा सहकारी संस्थांमध्ये सुरादेवी, पावंनगाव, आजनी, नान्हा -मांगली, गुमथळा, आसलवाडा,उमरीकोट, वडोदा, गादा, आडका, सावळी, गारला, भुगाव, पांढुर्णा, सोनेगाव व नेरी चा समावेश आहे.
बॉक्स-हुकूमचंद आमधरे-गावोगावी सुरू असलेल्या सोसायटी निवडणुका ह्या अटीतटीच्या होतात मात्र कामठी तालुक्यातील उपरोक्त नमूद 15 सेवा सहकारी संस्थांनी बिनविरोध निवडणूक पार पाडण्यात मोलाची भूमिका साकारली असून इतर 12 सेवा सहकारी संस्थांनी या बिनविरोध झालेल्या सेवा सहकारी संस्थांचा आदर्श इतर गावांनी घेऊन सदर सेवा सहकारी संस्थांची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी प्रयत्न करून एक आदर्श निर्माण करावा असे आव्हान कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हुकूमचंद आमधरे यांनी केले आहे.
-दुसऱ्या टप्यातील 10 सेवा सहकारी संस्थेचे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची मुदत 31 मे ला संपली असून या 10 सेवा सहकारी संस्थाची नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अंतींम दिनांक 15 जून आहे . या 10 सेवा सहकारी संस्थामध्ये लोंणखैरी ,वारेगाव,निंबा, खापा, पिपळा, जाखेगाव 1, जाखेगाव 2, म्हसाळा,कोराडी ,येरखेडा , व कढोलीचा समावेश आहे.तिसऱ्या टप्प्यातील 2 सेवा सहकारी संस्थांच्या नामनिर्देशन पत्र स्वीकारणेची अंतिम मुदत 7 जून पर्यंत होती यामध्ये शिरपूर आणि बाबूलखेडा या दोन सेवा सहकारी संस्थांचा समावेश आहे.
कामठी तालुक्यातील 27 पैकी 15 सेवा सहकारी संस्थांची बिनविरोध निवड
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com