केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत  ग्रीन ॲशकॉन आणि ग्रीन बिल्डकॉन २०२१  चा  समारोप  

 

-फ्लाय ॲशच्या विविधांगी उपयोगावर भर

-तांत्रिक आणि बौद्धिक सत्र  संपन्न

-इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिर्स येथे फ्लाय अशा संबंधित उत्पादन आणि  प्रदर्शनी उद्या नागरिकांना पाहण्यासाठी सकाळी ११ वाजे पासून खुली राहणार आहे 

नागपुर – हरित बांधकाम साहित्य (ग्रीन बिल्डिंग मटेरियल) आणि फ्लाय ॲशचा उपयोग यावर आयोजित ग्रीन ॲशकॉन आणि ग्रीन बिल्डकॉन २०२१ परिषदेचा समारोप आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबोधनाने होणार आहे. या त्रिदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रास आज सुरुवात झाली. राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचे संजीव कुमार सक्सेना यांच्या टिकाऊ ॲश वापर यावरील पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनद्वारे आजच्या सत्राची सुरुवात झाली.फ्लाय ॲशची मागणी वाढायला हवी आणि सर्व क्षेत्रात या उत्पादनाचा वापर व्हायला हवा असे प्रतिपादन त्यांनी केले. फ्लाय ॲश म्हणजे टाकाऊ पदार्थ आहे ही भावना नागरिकांच्या मनातून दूर करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी इनटिपीसीबाबत थोडक्यात माहिती दिली. एनटिपीसी अंतर्गत ३३ कोळसाआधारित, ११ गॅस आधारित आणि ३२ अक्षयऊर्जा आधारित प्रकल्प कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. फ्लाय ॲशपासून उत्पादित होणाऱ्या गिट्टीजन्य आणि खडबडीत खडकजन्य उत्पादनांची किंमत सिमेंटजन्य पदार्थांएवढीच असल्याने हे परवडणारे देखील असल्याचे ते म्हणाले.कृषी आणि बांधकाम क्षेत्रात देखील या फ्लाय ॲश आणि पौंड ॲशच्या उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी एनटीपीसीतर्फे उत्पादित करण्यात येणाऱ्या जिप्सम प्लास्टरची उपस्थितांना माहितीही दिली. यानंतर कोराडी पॉवर स्टेशनचे मुख्य अभियंता राजकुमार तासकर यांनी एनटीपीसीच्या पीपीटी सादरीकरणाचे सार थोडक्यात सर्वांना सांगितले.

त्यानंतर अडाणी पॉवरचे फ्लाय ॲश व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष सतीश कुमार तंवर यांनी फ्लाय ॲश व्यवस्थापन या विषयावर माहितीपट सादर केला. फ्लाय ॲश टाकाऊ पदार्थ नसून संसाधन असल्याचे मत त्यांनी मांडले. सिमेंट कारखान्यांमध्ये आणि संबंधित क्षेत्रांमध्ये ३० ते ३५ टक्के फ्लाय ॲशचा वापर होत आहे. हा वापर अधिक वाढायला हवा. भारतात दिवसागणिक या ॲशचा वापर वाढत असून २०१५ च्या मानाने २०२१ मध्ये या क्षेत्रांत ९२ टक्के फ्लाय ॲशचा वापर झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  फ्लाय ॲशच्या वाहतुकीस अनेक अडथळे असून सरकारी सहाय्याची आवश्यकता आहे. यासह कृषी क्षेत्रात या उत्पादनाचा वापर मातीची उत्पादकता, प्रत वाढविण्यासाठी व बांधकाम क्षेत्रांत वाळू, गिट्टीला पर्यायी उत्पादन म्हणून वापर होणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.यासाठी कोळसा खाणींनी फ्लाय ॲश वापर आणि अतिरिक्त उत्पादनाला प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले.निर्यात वाढून उद्योगाला चालना मिळावी तसेच फ्लाय ॲशचे उत्पादन आणि वापर वाढावा म्हणून यावेळी त्यांनी अडाणी प्लांटमध्ये फ्लाय ॲशसाठी असलेल्या विविध संधींची आणि आवश्यकतेची माहिती उपस्थितांना दिली.
ग्रीन ॲशकॉनचे संयोजक सुधीर पालिवाल यांनी फ्लाय ॲशचा थेट वापर न करण्याबाबत उपस्थित सर्व उद्योजकांना आणि अभ्यासकांना जागरूक केले. फ्लाय ॲशवर प्रक्रिया करून त्यानंतर तिचा वापर शेती तसेच बांधकाम व इतर क्षेत्रात करता येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीमध्ये फ्लाय ॲशचा थेट वापर केल्यास पहिल्या टप्प्यात उत्पादन वाढते परंतु त्याचे दूरगामी विपरीत परिणाम होतात.त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट या फ्लाय ॲशचा वापर करू नये यासाठी जागरूकता करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पालिवाल यांच्या या विषयावरील अभ्यास उत्तम असल्याने सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा असे प्रतिपादन तंवर यांनी केले. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स नागपूरचे अध्यक्ष इंजि. मिलिंद पाठक यांनी सादर करण्यात आलेल्या पीपीटी सादरीकरणाचे सार सर्वांना सांगितले. कोळसा खाणींनी आपल्या अधिकारक्षेत्रात मोठ्या प्रमाणात फ्लाय ॲशचा वापर करावा असे मत देखील त्यांनी मांडले.

फ्लाय ऍशचा वापर आणि व्यवस्थापनातील अनुभवी श्री. विपिन दवे यांनी फ्लाय ऍशपासून  पेलेट्सच्या निर्मितीची एक अतिशय आर्थिक पद्धत सादर केली ज्यामध्ये धावपट्टीचा पाया तयार करण्यासाठी पुरेसा कॅलिफोर्निया बेअरिंग रेशो (CBR) वापरला जाऊ शकतो. ब्रेटन-इटलीचे मिस्टर टिटोटू स्टेफानो यांनी भारतीय फ्लाय अॅश आणि स्टोन वेस्टचा इंजिनीअर स्टोनच्या उत्पादनात वापर करण्याबाबत उत्कृष्ट सादरीकरण केले. रिशीत दयाल , संचालक JAYCEE यांनी फ्लाय ऍशच्या निर्यात क्षमतेवर, झाक, जर्मनी येथील डॉ. निक्लॉस ग्रुनेनफेल्डर यांनी राखेचा स्मार्ट बांधकाम साहित्य म्हणून वापर करण्यावर बोलले. इतर सत्रांमध्ये कचऱ्यापासून पर्यायी इंधन मनोज नटराजन, संचालक गोएंवी टेक्नॉलॉजीज, नुपूर ऋषबूड, टेक्निकल डायरेक्टर ग्रीन बिल्डिंग सोल्युशन्स अ‍ॅट डिझाईन ट्री यांनी  ग्रीन बिल्डिंग मटेरियल मध्ये फ्लाय ऍशचा वापर याविषयीचे सादरीकरण केले  MAHGENCO चे नितीन वाघ यांच्या वतीने संदिप किनाके यांनी केले फ्लाय ऍशचा वापर  या वर सादरीकरण केले

या ठिकाणी फ्लाय ॲश संबंधी विवीध वस्तूंचे  प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे. समारोपाच्या दिवशी  सुनील केदार.  पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री, महाराष्ट्र शासन. आशिष जयस्वाल, माननीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ. दयाशंकर तिवारी, महापौर, नागपूर. कृपाल तुमाने, माननीय खासदार. डॉ. विकास महात्मे यांची देखील उपस्थिती असेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

अन्नामृत फाउंडेशनच्या कार्याचे राज्यपालांकडून कौतुक

Sat Dec 18 , 2021
-करोना काळात कोट्यवधी लोकांना भोजन देण्यात सहकार्य देणाऱ्या दानशूर उद्योगसंस्थांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार -पूजा करणे सोपे; जनसामान्यात ‘हरेकृष्ण‘ पाहणे हीच खरी ईशसेवा‘ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी    मुंबई – पैसा, शक्ती, विद्या अनेकांकडे असते परंतु त्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी करण्याची प्रेरणा कमी लोकांना मिळते. ईश्वराची पूजा करणे सोपे आहे; परंतु जनता जनार्दनाच्या आत जो ‘हरेकृष्ण’ आहे त्याची सेवा करणे हे श्रेष्ठ कार्य आहे, असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com