कामठीत ट्वीटरवर धर्मगुरू विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या दोन पसार आरोपी तरुणास अटक

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी

-आरोपीना एक दिवसाची पोलीस कोठडी तर एक आरोपी तरुणींची जामिनावर सुटका

कामठी ता प्र 14 :-फेसबुक वरून सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्मगुरूच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने रविवारला रात्री 10 वाजता सुमारास शहरात निर्माण झालेल्या तणावाच्या घटनेतील पसार असलेल्या दोन मुख्य तरुण आरोपींना नवीन कामठी पोलिसांनी मध्यरात्री अटक करून दोनही आरोपीस आज कामठी येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून याच घटनेतील आरोपी तरुणींची जामिनावर न्यायालयाने सुटका केली.
फेसबुक वर झालेल्या चॅटिंग कॉमेंट्स मध्ये कामठी ची एक तरुणी तसेच दोन तरुणांनी धर्मगुरू च्यासंदर्भात आक्षेपार्ह व अपमानास्पद संदेश व्हायरल केल्याने एका विशिष्ट समाजबांधवांच्या भावना दुखावल्या , ही बातमी हवेसारखी पोहोचताच , शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अशा आक्षेपजनक वक्तव्य करणाऱ्यावर गुन्हे दाखल करीत अटक करण्याच्या मागणीसाठी कामठी शहरात रविवारला रात्री 9,30 वाजेपासून ते मध्यरात्री 1वाजेपर्यंत दोनही पोलीस ठाण्यात तणावाची स्थिति निर्माण झाली होती जवळपास 5 हजार च्या वर संख्येतील विशिष्ट समाजबांधवांनी जुने व नवीन दोन्ही पोलीस स्टेशन ला घेराव करीत पोलीस प्रशासनाला वेठीस धरले. नागपूर –जबलपूर महामार्गावरील नवीन कामठी पोलीस स्टेशन ते हॉकी बिल्डिंग व गोयल टॉकीज चौक पर्यंत विशिष्ट समाजबांधवांचा एकच जमाव दिसून येत होता ,संतप्त जमावाने काहो काळ महामार्ग बंद केल्याने जवळपास तीन तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.तर काहींनी वाहनावर दगडफेक करून पोलीस स्टेशन समोरील एका पॉश हॉटेल वर सुद्धा दगडफेक केली .ही तनावपूर्ण स्थिती आवाक्याबाहेर असून परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांनी अतिरिक्त पोलीस दल बोलावीत खुद्द पोलीस आयुक्त अमितेशकुमार ,पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, चिनमय, पंडित, लोहीत मतांनी, नयन आलूरक यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आणली आरोपिवर गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्याच्या आश्वानावर संतप्त जमावानी मोकळा श्वास घेतला.व तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आली. मायनोरीटीज डेमोक्रिटिक पार्टी चे नागपूर शहर अध्यक्ष फहीम खान तसेच न्यू येरखेडा रहिवासी अफजल शेख मोहम्मद आरिफ शेख ने नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी 19 वर्षीय तरुणी रा. काटी ओली कामठी , रौनी भाई उर्फ रौनक दिनेश यादव, वय 24 राहणार मोदी पडावं कामठी व अमन सुनील मेमन वय 20 राहणार रमानगर कामठी विरुद्ध याचेे विरोधात भादवी कलम 295, 153,34,66 सी, माहिती तंत्रज्ञान अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करून दोनही तरुण आरोपीस सोमवारला मध्यरात्रीअटक करण्यात आली व दोनही आरोपींना कामठी येथील प्रथम दिवाणी श्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अटक दोन्ही तरुण आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याच घटनेतील 19 वर्षीय तरुणी आरोपीस न्यायालयाने जामिनावर सुटका केली. घटनेचा पुढील तपास दुय्यम पोलीस निरीक्ष कमलाकर गड्डीमे करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कन्हान व कांद्री येथे वट पौर्णिमा उत्सव थाटात साजरा

Tue Jun 14 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – वट पौर्णिमा निमित्य विवाहित स्त्रियांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करून वटवृक्षा ची विधिवत पुर्जा अर्चना करून कन्हान व कांद्री परि सरात वट पौर्णिमा उत्सव थाटात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वट पौर्णिमा व्रत येत असुन हिंदु धर्मात या व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे. मागील दोन वर्षापासुन कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे स्त्रियांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com