हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीचा अहवाल खुला करुन सूचना मागवाव्यात – कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबईदि. 16 : राज्यातील हळद पिकाच्या लागवडप्रक्रिया व निर्यात यामधील समस्या व त्यावरील उपाययोजनांच्या अनुषंगाने खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने तयार केलेला अहवाल खुला करुन यावर सूचना मागविण्यात याव्यातअसे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

            आज मंत्रालयात हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीच्या अहवालाचे कृषीमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सादरीकरण करण्यात आले. यावेळी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटीलआमदार अमित झनकआमदार महेश शिंदेकृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेकृषी आयुक्त धीरज कुमार (दूरदृश्य प्रणालीद्वारे)पणन महामंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवारसंबंधित अधिकारी उपस्थित होते.

            कृषीमंत्री श्री.भुसे म्हणालेभारत हा जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रतेलंगणातमिळनाडूछत्तीसगडआंध्रप्रदेश या राज्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सन 2020-21 मध्ये महाराष्ट्र हे हळद पीक क्षेत्रानुसार देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. त्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण महत्वाचे असून शासन याबाबत सकारात्मक आहे. या समितीने प्राथमिक अहवाल खुला करावा. पुढील 15 दिवसात योग्य सूचनांचा समावेश करुन अंतिम अहवाल लवकर सादर करावा. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर सादर करुन सर्वसमावेशक हळद संशोधन व प्रक्रिया धोरण मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात येईलअसेही मंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.

            सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांच्या माध्यमातून हळद पिकासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सहकार्य कसे करता येईल याचाही विचार करावा. तसेच पणन विभागशेतकरी गटसार्वजनिक खासगी सहभागी तत्वावरपवई येथे केलेले संशोधन या सर्वांचा अभ्यास करुन अंतिम अहवाल लवकर सादर करावाअसे सांगून मंत्री श्री.भुसे यांनी समितीचे अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

येवला तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे जलदगतीने करावी - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील  

Wed Feb 16 , 2022
  मुंबई, दि. 16 : जलजीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील धुळगाव व १७ गावे तसेच राजापूरसह ४१ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही जलदगतीने  करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील या गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे कामांना प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर मिळावी, अशी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com