संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 22 :- अंतरराष्ट्रीय ख्यातीचे बौद्ध विद्वान बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभुमी महाविहार कामठी रोड खैरी चे संस्थापक अध्यक्ष आल इंडिया भीक्खु संघ चै पुर्व संघानुशासक डॉ भदंत आनंद कौसल्यायन आणी संस्थापक सचिव आल इंडिया भीक्खु संघ ने पुर्व संघनायक डॉ भदंत सावंगी मेधनकर महास्थविर यांच्या श्रमसाफल्यातुन साकारलेल्या बुद्धभुमी महाविहार येथे दैदिस्यमान सोदर्यीकृत सुशोभीत विधृत रोशनाई हजारो दिव्यांची रोषणाई धम्मध्वज पताका आदीने सुसज्जीत वातावरणात परंंपरागत बौद्ध संस्कृती नुसार न भुतो न भविष्यती अशा वातावरणात आदरनिय भीक्खु संघ आणी पांढऱ्या शुभ्र वस्त्रात उपोषथ अधिष्ठान ग्रहण करुण उपासक उपासिका दायक दायीकां यांच्या सहभागात दिनांक १६/५/२०२२ला रात्री ७-००वाजता विशेषता दिप पुजा धुप पुजा पुष्प पुजा बोधी पुजा परित्त देसना संस्थान चे सहसचिव भदंत सिवनी बोधानंद महास्थविर यांच्या मार्फत घेण्यात आली या प्रसंगी संस्थान चे सचिव भदंत प्रज्ञाज्योती स्थविर यांनी संस्थान च्या वाटचालीची माहिती दिली यापुढील महत्वपूर्ण असलेल्या डॉ भदंत आनंद कौसल्यायन आणी डॉ भदंत सावंगी मेधनकर महास्थविर यांच्या चैत्याच्या सोबतच सम्राट अशोक स्तभ उभारण्यासह परिसराला सदोदित सौंदर्यीकृत ठेवण्या सह संडे स्कूल साप्ताहिक ध्यान साधना व धम्मक्षेत्रातील अग्रगण्य उपक्रम राबवीण्यासाठी दायक दायीकां यांचा सक्रिय सहयोग अपेक्षित असुन प्रत्येक उपासकाचे हे कर्तव्य असल्याचे नमुद केले.
या प्रसंगी संस्थान चे अध्यक्ष भदंत सत्यशील महाथेरो व भदंत नाग दिपंकर स्थविर व श्रामनेर संघ आवर्जुन उपस्थीत होते.