संदीप बलविर, प्रतिनिधी
रक्तदान शिबिर घेऊन केले महामानवाला अभिवादन!
६६ रक्तदात्यांनी केले रक्तदान
विश्वशांती सामाजिक न्याय संस्थेचे आयोजन
नागपूर ०६ डिसें :- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्यासाठी अनमोल कष्ट उपसून स्वतःच्या संसाराची राखरांगोळी केली.आपल्या रक्ताचे पाणी होइस्तोवर सतत १८-१८ तास अभ्यास करीत जगातील सर्वांग सुंदर संविधानाच्या माध्यमातून जगण्याचे अधिकार दिले.म्हणून बाबासाहेबांचे वैचारिक वारस व सुजाण नागरिक या नात्याने मानवता, राष्ट्रीयता व सामाजिक समतेचा आदर्श जपत डॉ बाबासाहेबांना कृतिशील अभिवादन करण्यासाठी त्यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत बुटीबोरी येथील विश्वशांती सामाजिक न्याय या संस्थेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
बुटीबोरी येथील मेट्रो स्केअर येथे आयोजित रक्तदान शिबिरात आयोजकांनी सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व महामानव,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून सामूहिक त्रिशरण, पंचशील ग्रहण करून महामानवाला वंदन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नागपूर जी प चे विरोधी पक्षनेता आतिष उमरे,बुटीबोरी नगरपरिषदेचे मुख्यधिकारी राजेंद्र चिखलखुंदे,बुटीबोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील,नगरसेवक मनोज ढोके, बाबू पठाण,डॉ भीमराव मस्के,डॉ रामभाऊ वाणे आदी उपस्थित होते.या रक्तदान शिबिरात जीवन ज्योती ब्लड बँकेने रक्त संकलन केले.”ब्लड फॉर बाबासाहेब”या संकलपणेला उराशी बाळगत व बाबासाहेबांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन लक्षात घेत ६६ वैचारिक वारसदारांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेकरिता विश्वशांती सामाजिक न्याय संस्थेचे अध्यक्ष उमेश दखणे,अरविंद नाराय ने,चंद्राबाबू ठाकरे,राजू नगराळे,गणेश सोनटक्के, चंदू बोरकर,सुमित कांबळे,संजय भूमरकर,नंदेश वाघमारे, चंद्रशेखर निकोसे,नरेंद्र पाटील,अशोक ढाकणे, रतन मानवटकर,रवी फुलझेले,रवींद्र लोखंडे आदीने परिश्रम घेतले.