संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
कामठी – प्रदूषण मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी एका रोपाचे वृक्षारोपण करून त्याचे झाडात संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान समिती कामगार नगरच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी वृक्षमित्र मनोहर गणवीर ,कामठी तहसीलचे वरिष्ठ प्रस्तुतकार अमोल पोळ ,प्रकाश कांबळे ,मनीष गजभिये ,सुरेंद्र मेश्राम, सावन नागदेवे, राजेश ढोके ,संदीप कांबळे ,नितीन कांबळे ,उपनिरीक्षक शाम वारंगे , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद पिल्ले, पप्पू यादव, राजेश टाकळीकर ,संदीप सगने उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात 51 रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले.