पतीच्या त्रासाला कंटाळुन पत्नीची पो.स्टे. कन्हान ला तक्रार दाखल.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – सुट्टीवरून परत नौकरीवर जाण्यास निघाले ला पती सुर्यागुप्ता आकरे हा कामठी येथील दुस-या महिलेच्या घरी पत्नीने पकडल्याने पतीने घरी जाऊन पत्नीला मारझोड करून रॉकेल किंवा डिझेल पत्नी च्या अंगावर फेकुन जाळुन मारण्याचा पर्यंत केल्याने पत्नी सौ रानी आकरे हिने पोस्टे कन्हान ला तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी पती सुर्यागुप्ता विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पटेल नगर कन्हान येथील सुर्यागुप्ता आकरे वय ४० वर्ष व सौ रानी सुर्यागुप्ता आकरे वय ३५ वर्ष यांचे रितीरिवाजाने २००५ ला लग्न झाले असुन त्याना भुमी ही ५ वर्षाची मुलगी आहे. सुर्यागुप्ता आकरे हे सैन्यात (आर्मी) नौकरीवर असुन संध्या ते बबिना झांसी येथे कार्यरत असुन २ ते ३ महिन्यांनी सुट्टीवर घरी येतात. माझे पती यांचे गेल्या अडीच वर्षापासुन कामठी येथे राहणारी सिम्मी शाहु हिच्या सोबत प्रेमसंबंध आहेत. तेव्हा पासुन ते माझ्या सोबत झगडा भांडण करून मारझोळ करतात. ते मला नेहमी माझ्या आई कडुन २० ते २५ लाख रूपये आणण्यास म्हणतात आणि जर का मी त्यांना पैसे आणण्यास मनाई केली तर मला माझ्या माहेर कडील शेतीचा हिस्सा मागण्यास नेहमी म्हणतात. अशा प्रकारे माझे पती मला नेहमी जेव्हा कधी सुट्टयावर आले तेव्हा शारिरीक व मानसि क त्रास देतात. माझे पती (दि.२५) सप्टेंबर ला सुट्टी घेऊन नौकरीवरून घरी कन्हान येथे आले. पण या सुट्टी दरम्यान ते दोन ते तिन दिवस माझ्या घरी राहिले आणि बाकी दिवस घराबाहेर कुठेतरी राहले. शनिवार (दि.१५) ऑक्टोंबर ला माझे पती दुपारी २.३० ते ३ वाजता मला म्हणाले कि, आज माझे रेल्वे रिजरवेशन असल्याने मी आज नौकरीवर परत जात आहे. ते त्यांची बॅग घेऊन जाण्यास निघाले. परंतु मी पती चे रिजरवेशन टिकट पाहली होती. त्या टिकीट मध्ये त्यां चे रिजरवेशन (दि.१६) ऑक्टोंबर ला असल्याचे मला माहिती असुन मी त्यांना नौकरीवर जाण्यास मुळीच थांबविले नाही. आणि रिजरवेशन बाबतही त्यांना काहीच बोलली नाही. माझे पती हे त्यांची बॅग घेऊन माझ्या घरून निघुन गेल्याने मला पतीवर संशय आला कि, ते नौकरीवर न जाता ते कामठी येथील त्यांची प्रेमीका सिम्मी शाहु हीचा कडे गेले असावे करिता सौ रानी संध्याकाळी ८ वाजता घोरपड रोड कामठी येथे सिम्मी शाहु हिचा घरी गेली तर तेथे पती हे सिम्मी शाहु हिचा घराचा आत असल्याने तिचे घरात जाऊन पाहले तर माझे पती मला समोर पाहुन काहीच बोलले नाही. तेव्हा मी त्यांना सिम्मी शाहुच्या घरी येण्या बाबद बोल ले असता माझे पती आणि सिम्मी शाहु हे माझ्या सोब त भांडायला लागले. तेव्हा मी एकटी असल्याने तिथुन सरळ माझ्या घरी कन्हान येथे आली. रात्री ९.१५ वाज ता मी माझ्या घरी हजर असताना माझे पती हे घरी आले आणि मला जेवन मांगितले तेव्हा मी म्हटले कि तुम्ही जिचा घरी गेले होते. तिलाच जेवण मागायचे होते. तेव्हा माझ्या पतीने माझ्याशी झगडा भांडण करा यला सुरूवात केली आणि माझे केस पकडुन गालावर ती थापळा मारल्याने मी घराबाहेरील गँलरीत आली. तेव्हा पतीने घराबाहेर सुध्दा गॅलरीत मारहाण केली आणि हातामध्ये प्लॉस्टीकचा बॉटेलमध्ये राँकेल किंवा डिझेल सारखा असणारे माझ्या अंगावर फेकुन जिवे मारून जाळण्याचा प्रयत्न केल्याने मी गॅलरी मधुन खाली उतरून पोलीस स्टेशन कन्हान ला पतीचा विरो धात तक्रार देण्याकरिता जात असता माझ्या पतीने मला रस्त्यात थांबवुन तु पोलीस स्टेशन नको जाऊ, तु घरी चल असे म्हणुन मला वारंवार विनवनी करू लागले. परंतु मी माझ्या पतींचा नेहमीच्या त्रासामुळे कंटाळु न पोस्टे कन्हान ला तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी माझे पती सुर्यागुप्ता आकरे यांचे विरूध्द अप क्र. ६००/२०२२ कलम ३०७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

"चला जाणूया नदीला" - कठानी नदी संवाद यात्रेचा शुभारंभ

Mon Oct 17 , 2022
गडचिरोली :- अलीकडील काळातील कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी यामुळे पूर दुष्काळ या समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्याचा शेतीवर विपरीत परिणाम होत असतो. नद्यांमधील गाळामुळे नदीची वाहन क्षमता, साठवण क्षमता घटली आहे. त्यामुळेच नदीला जाणून घेणे, तिचं स्वास्थ सुधारणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जलपुरुष राजेंद्र सिंग यांच्या संकल्पनेतून चला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com