महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत पुणे, अमरावती आणि नाशिकला जन सुनावणी

मुंबई, दि.20 : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत पुणे, अमरावती आणि नाशिक येथे जन सुनावणी आयोजित केली आहे. आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही सुनावणी घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे संशोधन अधिकारी मेघराज भाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            जनसुनावणी चा तपशील खालील प्रमाणे

अ.क्र. विभागाचे नाव सुनावणी दिनांक व ठिकाण वेळ सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या जाती/जमातीचे नाव
1 पुणे 30 जून 2022

व्हि.व्हि.आय.पी. शासकीय विश्रामगृह, पुणे.

दु. 2.00 वा पासून 1)     सगर

2)     कडिया

3)     कुलवाडी

4)    टकारी

5)    लिंगायत रड्डी

2 अमरावती 05 जुलै 2022

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, अमरावती.

सकाळी 11.00 वा पासून 1)      हलवाई

2)     हलबा कोष्टी

3)      अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर

4)     गुरुडी, गुरुड, गुरड, कापेवार , गु.कापेवार, गुरुड कापेवार, गुरुडा कापेवार इ.

5)     हडगर

6)     तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरुस्ती करणेबाबत

7)     केवट समाजातील तागवाले/तागवाली

3 नाशिक 15 जुलै 2022

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक.

सकाळी 11.00 वा पासून 1)     काथार/कंठहारवाणी

2)     कंसारा

3)     अत्तार जातीच तत्सम जात पटवे, पटवेगर, पटोदर

4)    बैरागी जातीच्या संदर्भात शासन निर्णायात दुरुस्ती

5)    चेवले गवळी दाभोळी, गवळी व लिंगायत गवळी

6)     नावाडी

16 जुलै 2022

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक.

सकाळी 11.00 वा पासून 7)    वळंजूवाणी, कुंकारी वळांजूवाणी, वळुंज बळुंज, शेटे, दलाल इ.

8)    लाडशाखीय वाणी

9)     लाडवंजारी

10)  रामगडिया सिख

11)   कानडे/कानडी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बालगृहातील ५२९ विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले अभिनंदन  

Mon Jun 20 , 2022
मुंबई, दि. 20 : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत राज्यातील बालगृहातील ५२९ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळविले आहे. यापैकी ७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे. मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, बालगृहातील या विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत उज्ज्वल यश संपादन केले आहे, याचा मला अभिमान आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com