प्रतिनिधी किशोर साहू
अरोली: येथून जवळच असलेल्या रेल्वे स्टेशन रेवराल येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय मंडईची सुरुवात आज दिनांक 15 जानेवारी बुधवार दुपारी दोन वाजता पासून जंगी कुस्त्यांच्या आमदंगलने सुरुवात होणार आहे.
रात्री आठ वाजता वार्ड नंबर एक मध्ये जीवन ज्योती उर्फ नऊ लाख की चोरी वार्ड नंबर तीन मध्ये किसान की रोटी उर्फ लाडकी बहीण या नऊ अंकी नाटकाचे सादरीकरण होणार आहे. 16 जानेवारी गुरुवार ला सकाळी नऊ वाजता पासून वार्ड नंबर दोन मध्ये जि. गोंदिया तालुका आमगाव मुक्काम पोस्ट किकरीपार येथील शाहीर सोनूताई गायधने साथी अरुण बनसोड विरुद्ध जि गोंदिया तालुका सडक अर्जुनी मुक्काम पोस्ट बिरी येथील शाहीर महादेव साथी उमेश भाऊ यांच्यासोबत राष्ट्रीय दुय्यम खडा तमाशा, वार्ड क्रमांक तीन मध्ये रेवराल येथील शाहीर अतुल श्रावणकर यांच्या खडा तमाशा, वार्ड क्रमांक एक मध्ये धापेवाडा येथील शाहीर सुनील भाऊ साथी दिलीप यांच्या खडा तमाशा, वार्ड क्रमांक दोन मध्ये गोंदिया येथील लावणी डान्स ग्रुप एक झलक सबसे अलग यांच्या लावणीच्या कार्यक्रम, 16 जानेवारी गुरुवार ला वार्ड क्रमांक चार मध्ये रात्री नऊ वाजता वडसा येथील सैराट कन्हैया लावणी ग्रुप यांच्या लावणीच्या कार्यक्रम ,17 जानेवारी शुक्रवारला रात्री नऊ वाजता रेवराल टोली वार्ड क्रमांक एक मध्ये भंडारा येथील सरकार लावणी ग्रुप डान्स यांच्या लावणीच्या कार्यक्रम, वार्ड क्रमांक दोन मध्ये वडसा येथील तीन अंकी नाटक स्वराज्य नाट्य रंगभूमी यांच्या खेळ मांडला अर्थात लाचारी, इत्यादी भरगच्च तीन दिवसीय सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
या कार्यक्रमाला उद्घाटक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अध्यक्ष अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विशेष अतिथी खासदार श्यामकुमार बर्वे, माजी आमदार टेकचंद सावरकर, डी मल्लिकार्जुन रेड्डी, राजेंद्र मुळक, शिवराज (बाबा) गुजर, सदानंद निमकर, सभापती स्वप्निल श्रावणकर , जि प सदस्य राधाताई मुकेश अग्रवाल ,तापेश्वर वैद्य ,मनोज कोठे ,गोवर्धन दादुरे , ठाणेदार स्नेहल राऊत, सरपंच परम धमय्या मैनेनी ,रमेश चरडे, सविता इंगळे, वैशाली तांबुलकर, निशा फटिंग, लक्ष्मी चौधरी, पोलीस पाटील सारंग श्रावणकर, तंटामुक्त अध्यक्ष अरुण मदनकर, चिंतामण मदनकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य आशिष पाटील सह गावातील, परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन आखाडा समितीचे पदाधिकारी गुलाब मदनकर ,अविनाश भोंडे, अक्षय श्रावणकर, उद्दल मदनकर, अविष बघेल इतर सदस्यगणां सह आयोजक समिती सरपंचा मनीषा आशिष पाटील ,उपसरपंच , श्रीमोहन धांडे ,ग्रामपंचायत सदस्यगण अंतराम श्रावणकर, योगेश आस्वले, प्रवीण खंगार, गोपाळ ठोंबरे, अल्का दादुरे सुषमा भोयर, भूमिका दहिवले बबीता निंबुळकर शितल इरपाते यांनी केले आहे व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त ग्रामवासी सहकार्य करत असून वार्डा वार्डातील आयोजक मंडळी परिश्रम घेताना दिसत आहे.