महापौरांना आलेल्या धमकीच्या पत्राबाबतचा तपास लवकरात लवकर पूर्ण करणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील    

 मुंबईदि. 23 : मुंबईच्या महापौरांविरूद्ध आक्षेपार्ह विधान तसेच त्यांना आलेल्या पत्रामधून त्यांना आणि कुटुंबियांना दिलेल्या धमकीबाबत चौकशी सुरू असून लवकरात लवकर तपास पूर्ण केला जाईल. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाचे संरक्षण ही शासनाची जबाबदारी असून जेथे जेथे अशा घटना घडतीलतेथे गुन्हा करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाहीअसे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सदस्य सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

            महापौरांना दिनांक 10 डिसेंबर 2021 रोजी अज्ञात व्यक्तीने कारणाने पोस्टाने बंद लिफाफ्याद्वारे पत्र पाठवून त्यामध्ये अश्लील व घाणेरड्या भाषेतील मजकूर पाठवून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी प्राप्त झाल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असून हा गुन्हा  तपासाधीन आहे. या घटनेच्या अनुषंगाने मुंबईच्या महापौरांना सुरक्षेकरिता योग्य तो पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आलेला असल्याचेही वळसे पाटील यांनी लक्षवेधीच्या लेखी उत्तरात सांगितले.

            यासंबंधीच्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीससदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवारअजय चौधरीअमित साटमश्रीमती मनीषा चौधरी आदींनी सहभाग घेतला.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

दिलखुलास' कार्यक्रमात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांची मुलाखत

Thu Dec 23 , 2021
मुंबई, दि. २३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या अॅपवर शुक्रवार दि. २४ आणि शनिवार दि. २५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे. महिला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com