खापरखेडा-प्रतिनिधी
कार्यक्रमाला ग्रामिण पोलीस अधिक्षक उपस्थित..
खापरखेडा – विजयादशमीच्या पावन पर्वावर दरवर्षी प्रमाणे रावण दहन उत्सव समिति, चनकापुर च्या वतीने चनकापूर क्रिडा मैदानावर रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन २४ ऑक्टोबरला सायंकाळी करण्यात आले होते रावण दहन कार्यक्रमाला ग्रामिण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार आवर्जून उपस्थित होते.
यावेळी जि.प.सदस्य प्रकाश खापरे, निलिमा उईके, पाटणसावंगी कोळसा खान प्रबंधक गौरव पांडे, सावनेर पंचायत समिती उपसभापती राहुल तिवारी, सरपंच पवन धुर्वे, चंद्रशेखर लांडे, मिनाक्षी तागडे आदि उपस्थित होते.
सायंकाळच्या दरम्यान संपुर्ण मैदानावर आकर्षक रोशनाई करण्यात आली होती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन आदि व्यवस्था करण्यात आली होती याप्रसंगी श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या सजीव झाक्या तयार करण्यात आल्या होत्या यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाक्यांची पूजाअर्चना करण्यात आली याप्रसंगी भजन गायक तुषार सुरपैठनकर व त्यांच्या समूहाने एका पेक्षा एक सरस भजने सादर केली रावण दहन बघण्यासाठी हजारोच्या संख्येत नागरिकांनी मैदानावर गर्दी केली होती.
रावण दहनकार्यक्रमा दरम्यान फुगे, खेळने आदि विविध प्रकारची दुकाने लावण्यात आली होती कार्यक्रमाचे मुख्य अतिथि नागपुर ग्रामीण के पुलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी आपल्या भाषणात चांगले विचार ठेवल्यास समाज आदर करतो तेव्हा चांगले विचार आत्मसात करा चुकीच्या मार्गाने जाऊ नका तेव्हा अपराध मुक्त समाज निर्माण होईल असे सांगून सर्व नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रभू रामचंद्रांच्या वेशभूषेत असलेल्या चिमुकल्या बालकाचे हस्ते रावण दहन करण्यात आले यावेळी पोलीसांचा चोख बंदोबस्त होता.