संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी – ग्रामीण भागातील तरुणांनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपला व आपल्या गावाचा नावलौकिक करण्याचे आव्हान महाराष्ट्र प्रदेश भाजप चे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी तालुक्यातील रामकृष्ण लेआउटखेडा येथे आयोजित रास गरबा कार्यक्रमाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले रामकृष्ण लेआउट न्यूयेरखेडाच्या वतीने अश्विन नवरात्राच्या पर्वावर आयोजित रास गरबा पुरस्कारान वितरण सोहळ्याची सुरुवात महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते दीप प्रज्वलन व दुर्गा मातेच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच मंगला मनीष कारेमोरे, कामठी पंचायत समितीचे माजी उपसभापती देवेंद्र गवते ,कामठी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व खैरी ग्रामपंचायतचे सरपंच मोरेसर कापसे ,लिहीगाव ग्रामपंचायतचे सरपंच गणेश झोड, माजी सरपंच मनीष कारेर्मोरे ,कमल यादव ,लाला खंडेलवाल, राज हडोती, सुषमा राखडे, वंदना भस्मे ,मीना दास ,गौरीशंकर धीमोले, नूतन मुळे, प्राजक्ता ढोले, दिपाली सोनटक्के ,ग्रामपंचायत सदस्य गजानन तिरपुडे, राजकिरण बर्वे ,अमोल घडले ,पौर्णिमा बर्वे, वनीता नाटकर ,जया भस्मे उपस्थित होते ,राजश्री धीमोले ,पुनम दास, देवाश्री पवार ,मयूरी इंगोले, वंचिता लालबागे ,प्राची भोयर ,भूमिका जाधव ,ऋतुजा कारेमोरे, समीक्षा कार्यमोरे ,रितिका कटरे, आराध्य गीते यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगला कारेमोरे यांनी केले संचालन सुषमा राखडे यांनी केले व आभार प्रदर्शन वंदना भस्मे यांनी मांनले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.