नवनिर्मित मोक्षधाम सर्वांसाठी खुले करून मोक्षधाम समितीमध्ये सर्व समाजातील लोकप्रतिनिधिना समाविष्ट करावे..

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी 

-तहसीलदार ला सामूहिक निवेदन सादर

-बहुजन रिपब्लिकन एकता मंच सहित विविध सामाजिक संघटनेने तहसील कार्यालय समोर केले नारे निदर्शने

कामठी ता प्र 25 :- आज 25 ऑगस्ट ला बहुजन रिपब्लिकन एकता मंच सहित विविध सामाजिक संघटनांनी नवनिर्मित मोक्षधाम सर्वांसाठी खुले करावे तसेच मोक्षधाम समितीमध्ये सर्व समाजातील प्रतिनिधीना समावेश करावे या मागणीसाठी तहसील कार्यालय समोर नारे निदर्शने करून शासनाचे लक्ष केंद्रित करण्यात आले.

कामठी शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त आहे.येथील नगर परिषद नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर परिषद आहे.या नगर परिषद अंतर्गत हिंदू, बौद्ध, मुस्लिम समाजाची लोकसंख्या समप्रमाणात आहे.तरीही येथील प्रशासनाने मोक्षधामाची निर्मिती केल्यानंतर त्यावर हिंदू हा शब्द उल्लेख करणे योग्य नाही .नवनिर्मित मोक्षधाम हे सर्वाकरिता खुले असावे अशी मागणी बहुजन रिपब्लिकन एकता मंच सहित विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.

कामठी शहरात राणी तलाव मोक्षधाम हे मृतांच्या अंत्यसंस्कार उपयोगासाठी केला जात आहे.आता नविन मोक्षधाम ची निर्मिती केली आहे.मात्र यावर हिंदू मोक्षधाम असा फलक लावण्यात आला आहे.यामुळे इतर धर्मियांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.हा प्रकार समाजात तेढ निर्माण करणारा होऊ शकतो तसेच .मोक्षधाम समिती मध्ये इतर समाजाच्या प्रतिनिधींना समाविष्ट करण्यात आले नाही त्यामुळे इतर समाजात मोठ्या प्रमाँणात नाराजी व्यक्त केल्या जात आहे.

बहुजन रिपब्लिकन एकता मंच सहित विविध सामाजिक संघटनेच्या वतीने कामठी तहसील कार्यलय समोर मोठ्या संख्येने नारे निदर्शने करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने उदास बन्सोड, दिपणकर गणवीर,सुभाष सोमकुवर, नारायण नितनवरे,मोहन सातपुते, मनोहर गणवीर,अनुभव पाटील, अंकुश बांबोर्डे,मनीष डोंगरे, राजू भागवत,अमन घोडेस्वार, गौरव तांडेकर,रोहित पाटील, महेंद्र मेंढे,सावला सिंगाडे, विशाखा गेडाम,अलका तांबे,रेखा पाटील, उषा भावे,पुष्पां मेश्राम,मंदा येवले, संगीता राहाटे,वैशाली बन्सोड,शकुंतला शंभरकर,सुरेखा खांडेकर आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.हे निवेदन तहसीलदार अक्षय पोयाम यांना सादर केल्यावर तहसीलदार ने हे निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल अशी हमी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेनुसार उत्सव साजरा करा - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

Thu Aug 25 , 2022
– मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड संलग्न करण्यासाठी उपक्रम नागपूर, दि. २५ : गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह शांततामय वातावरणात उत्सव साजरा होण्यासाठी नागरिकांनी महसूल व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. ‘एक गाव, एक गणपती’ या अभिनव संकल्पनेनुसार सर्वांनी उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज येथे केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com