कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात दवंडीचे महत्व अजूनही कायमच

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 12:- पूर्वीच्या काळी शासन निर्णय, ग्रामसभा , लिलाव, रेशन दुकान चालू होणार असल्याची माहिती, राजकीय सभा, आपत्कालीन सूचना गावकऱ्यांना देण्यासाठी एका कामगारा मार्फत गाव पातळीवर दवंडी देण्यात येत होती .परंतु इंटरनेट च्या वाढत्या वापरामुळे ही पद्धत नामशेष होते की काय असं वाटतं असतानाच शासन निर्णयाच्या सूचना आणि माहिती गावकऱ्यांना देण्यासाठी ग्रामिण भागात दवंडीचा वापर केला जात असल्याने सोशल मीडियाच्या भाऊगर्दीतही कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात दवंडीचे महत्व अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वीच्या काळी (1870-80)आणि नव्वदच्या दशकात ही काही प्रमाणात)स्पीकरचा वापर लग्न समारंभ आणि काही महत्वाच्या कार्यक्रमातच होताना दिसत असायचा अशा वेळी गावकऱ्यांना काही महत्वाच्या सूचना किंवा आदेश द्यायचे असतील तर दवंडी हाच एकमेव मार्ग असायचा .2000 ते 2010 च्या दशकामध्ये मीडिया आणि इंटरनेट ने प्रगती केली परंतु प्रत्येकाच्या घरात ग्रामीण भागापर्यंत 2010 च्या दशकामध्ये मोबाईल हवे तितके पोहोचले नव्हते .2011ते 2020 या दशकात मात्र मीडियाने खूप प्रगती केली आहे .दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील अनेक वाहिन्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमा मुळे आकाशवाणी मागे पडली आहे अशातच पुन्हा प्रत्येक घरातच नव्हे तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल पोहोचला आहे.फेसबुक, व्हाट्सएप, टेलीग्राम, ट्विटर, युट्युब आदींचा वापर दूरचित्रवाणी पेक्षाही जास्त प्रमाणात होत आहे .जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात पडलेली किरकोळ घटनाही सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगातल्या कोपऱ्या पर्यंत पोहोचत आहे या झालेल्या डिजिटल बदलाचा उपयोग महत्वाच्या सूचना आणो माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयोग केला जात आहे परंतु अशा काळातही ग्रामीण भागात दवंडीचे महत्व कायम असल्याचे दिसून येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जुनी कामठी पोलीस स्टेशन दुय्यम पोलीस निरीक्षकविना

Thu May 12 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 12:-कामठी शहरात कायद्याचे राज्य निर्माण व्हावे या संकल्पनेतून कामठी शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन चा कारभार हा शहर पोलीस आयुक्तालाशी जोडत , शहरात दोन स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्माण करीत या प्रत्येकी पोलीस स्टेशन ला दोन पी आय ची नियुक्ती करण्यात आली होती.शहरातील जुनी कामठी पोलीस स्टेशन परिसरात संवेदनशील स्थिती ही केव्हाही निर्माण होत कायदा व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com