महामंडळाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्या जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन..

नागपूर : समाजातील विविध घटकांसाठी अनेक महामंडळाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध प्रवर्गातील लाभार्थ्यांनी महामंडळाकडे अर्ज करावेत व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा.अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व स्तरातील अधिका-यांनीही प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ हे विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी संलग्न व्यवसाय, लघु उद्योग, वाहतूक क्षेत्रातील संबंधित व्यवसाय, तांत्रिक व्यवसाय, पारंपारिक व्यवसाय अथवा सेवा उद्योग सुरू करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गटकर्ज व्याज परतावा योजना योजना सुरू आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो तर गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 50 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.

अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आयटीआय समोर दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर येथे अथवा दूरध्वनी क्र. ०७१२-२२४६८९४ वर किंवा www.vjt.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ हे चर्मकार समाजातील चांभार, मोची व होलार या समाजातील १८ ते ५० या वयोगटातील पात्र उमेदवारांकरीता व्यवसाय करण्यासाठी विशेष घटक योजना व बिज भांडवल योजना सुरू करण्यात आल्या आहेत. योजनेच्या लाभासाठी उमेदवारांनी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ, ३०५, तिसरा माळा, बी विंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आयटीआय समोर दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर येथे संपर्क साधावा.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

विविध प्रवर्गासाठी महामंडळ आहेत. परंतु ज्यांच्यासाठी कोणतेही महामंडळ नाही अशा बेरोजगार उमेदवारांसाठी एक हक्काचे महामंडळ म्हणजेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ होय. या महामंडळाच्या योजनांची संपूर्ण यंत्रणा व कार्यपद्धती ऑनलाईन असून पूर्णपणे पारदर्शक आहे. जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या मराठा व ज्या प्रवर्गाकरीता इतर स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही, अशा बेरोजगार उमेदवारांनी या महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा. या महामंडळाद्वारे वैयक्तिक कर्ज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज या तीन योजना प्रामुख्याने राबविल्या जातात. योजना लाभार्थीभिमुख असून जोपर्यंत आवश्यक माहिती www.udyog.mahaswayam.gov.in या वेब प्रणालीवर अपलोड करीत नाही तोपर्यंत कार्यवाही करता येत नाही. हे महामंडळ जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत क्र.२. दुसरा माळा(विंग-ए), सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे कार्यरत आहे. बेराजगार उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधावा.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ

शासनाने इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्यांतर्गत, देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लक्ष रुपये व परदेशात शिक्षणासाठी २० लक्ष रुपये मर्यादेत कर्जावर व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळार्माफत सुरु केली आहे. या योजनेत बँकेकडील भरलेल्या व्याजाच्या 12 टक्के पर्यंत परतावा मिळणार आहे. योजनेसाठी उमेदवाराचे वय १७ ते ३० वर्ष असावे, महाराष्ट्राचा रहिवासी असावा. इ.मा.व. असल्याचा जातीचा दाखला, तहसीलदार यांचा कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लक्ष पर्यंतचा दाखला किंवा नॉन क्रिमीलेअरच्या मर्यादित, बारावीमध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा, उमेदवार व त्यांचे पालक यांचे आधार कार्ड, छायाचित्र, आधार लिंक बचत खाते पासबुक, वयाचा पुरावा, शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत आवश्यक कागदपत्र आदी कागदपत्रे जोडावेत. योजना ऑनलाईन असून महामंडळाच्या www.msobcfdc.org या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत. आरोग्य विज्ञान व अभियांत्रिकी शाखेच्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रम, कृषी, अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान, दुग्धविज्ञान शाखेमधील सर्व संबंधित अभ्यासक्रम आदी. शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत बँकेने उमेदवाराला वितरीत केलेल्या कर्ज रक्कमेवरील व्याजाची नियमित परतफेड केलेल्या उमेदवाराला केवळ व्याजाचा परतावा महामंडळ उमेदवारांच्या आधार लिंक बँक खात्यात वर्ग करेन. परतफेडीचा कालावधी जास्तीत जास्त पाच वर्ष असणार आहे. ज्या पात्र उमेदवारांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी महामंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रहाटे कॉलनी, नागपूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंवा कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. ०७१२-२९५६०८६, मो. क्र. ९४२३६७७७४४ यावर संपर्क साधावा.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यामहामंडळामार्फत दारिद्रयरेषेखाली मातंग व तत्सम समाजातील लोकांचे जीवनमान उंचाविणे व समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळविण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी मदत करण्यात येते. योजनांच्या माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आयटीआय समोर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर येथे संपर्क साधावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Special Metro Services for Chhath Ouja on 31st October Services 4 am Onwards from Sitabuldi & Lokmanya Nagar

Sat Oct 29 , 2022
Nagpur :- One of the major festivals of India – Chhath Puja is being observed on 31st October. Devotees worship Sun while celebrating this festival. On this day, the followers perform mass pooja at water bodies. The number of such followers is large in Nagpur city. In order to facilitate journey of these followers, Maha Metro has decided to provide […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com