नागपूर : नागपूर महानगरपालिकेने बुधवारी (ता.३०) स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आशीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने आशीनगर झोन अंतर्गत सिध्दार्थ नगर येथील श्री डेअरी या दुकानांवर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत गणेशपेठ बस स्टँड जवळील धीरज बरगट असोसिएट यांच्याविरूध्द रस्त्यालगत असलेल्या झाडावर बॅनर आणि फलक लावल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
उपद्रव शोध पथकाने बुधवारी ०२ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.