स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक पिशवीचा वापर करण्यावर कारवाई

नागपूर, ता. ०१ : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.१) रोजी ०३ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३०  हजार रुपयांचा  दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मेन रोड सीताबर्डी येथील बालाजी गारमेंट या दुकानांवर प्लास्टिक  पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच नेताजी हाऊसिंग सोसायटी, काटोल रोड येथील चिराग बिल्डर्स यांच्याविरूध्द रस्त्यालगत बिल्डींगचे मटेरियल टाकल्याबाबत कारवाई करून १० हजार रूपयांचा दंड वसूल केला.

          त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत रामेश्वरी रोड येथील मेघना मेटल सर्विसेस यांच्याविरूध्द इलेक्ट्रीक खांबावर बॅनर आणि फलक लावल्याबद्दल कारवाई करून १०  हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव व प्रलंबित मोबदला तत्काळ दया - सुनील केदार

Fri Apr 1 , 2022
  कामगारांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या  नागपूर, दि. 1 : 1992 पासून आजतागायत 20 वर्षाचा कालावधी लोटून गेला आहे. तरीही  टाकळघाट व इतर 16 गावांतील शेतकऱ्यांना अजूनही जमीनीचा मोबदला मिळाला नसल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने याबाबत स्पष्टीकरण दयावे व तत्काळ या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्यास प्रलंबित मोबदला दयावा, असे स्पष्ट निर्देश पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com