शासनाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त आयोजित प्रदर्शनास पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची भेट

मुंबई :- शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्त गेल्या दोन वर्षात शासनाने केलेल्या कामगिरीवर आधारित माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात उभारलेल्या चित्रमय प्रदर्शनास  पशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी भेट दिली. यासंदर्भात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कौतुकही श्री.केदार यांनी केले. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक(वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे यांची उपस्थित होती.

राज्य शासनाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विविध विभागांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारे दोन वर्षे जनसेवेचीमहाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन मंत्रालयात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन माहितीपूर्ण आणि उपयुक्त असून किल्ल्याच्या भिंतींच्या पार्श्वभूमीवरील मांडणी देखील अतिशय आकर्षक असल्याची प्रतिक्रिया यावेळी श्री केदार यांनी व्यक्त केली.

सर्व विभागांनी या दोन वर्षात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती या चित्रमय प्रदर्शनातून अतिशय आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. चिरेबंदी किल्ल्याच्या उंच भिंतीची उत्तुंगता आणि त्या पार्श्वभूमीवरील प्रदर्शन पॅनल यांचा एकत्रित अनुभव घेता यावा यादृष्टीने तयार केलेल्या नाविन्यपूर्ण फिरता ३६० डिग्री सेल्फी पॉईंट  आकर्षून घेत असल्याचे श्री केदार यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अवैध मासेमारी रोखण्यासाठी कायदा कडक करणार - मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख

Tue Mar 15 , 2022
 मुंबई : कोकण किनारपट्टीतील समुद्र तसेच नद्यांच्या जल प्रदुषणातील वाढ रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. समुद्र तसेच नद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे जल प्रदूषण होऊ नये यासाठी प्रदुषणासंदर्भातील नियमावली आणखी कडक करण्यात आली आहे. त्याचबरोबर परराज्यातील मच्छिमार राज्यात येऊन मासेमारी करतात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा कठोर करणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली. मच्छिमारांचे प्रश्न […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!