राज्य राखीव पोलीस बल भरती प्रक्रीया पुढे ढकलली

नागपूर दि.31 : राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 4, नागपूर येथे वर्ग 4 कर्मचारी भरती 2022 मध्ये भोजन सेवकाची आठ पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 31 जानेवारीला उमेदवारांना परीक्षा व मूळ प्रमाणपत्र तपासणी करीता प्रत्यक्ष हजर राहण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र, प्रशासकीय कारणास्तव या तारखेवर ही भरती होऊ शकली नाही. भरतीची नवीन तारीख जाहीर केली जाईल व उमेदवारांना त्या तारखेस हजर राहायचे आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक डी. बी. ताम्हणे यांनी दिली. नवीन तारीख राज्य राखीव पोलीस बलाच्या https://www.maharashtrasrpf.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असे राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 4 चे समादेशक पंकज डहाणे यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

"समान संधी केंद्र" च्या वतीने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन

Mon Jan 31 , 2022
– विकास व गुणवत्ता वाढीसाठी समाज कल्याण विभागाचा प्रयत्न नागपूर,दि.31 : विविध महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्रीशिप व इतर शासनाच्या योजना व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबत उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन करण्यात येते. संवाद अभियान- युवा संवाद सारखे कार्यक्रम सुरु करण्याकरिता महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी “समान संधी केंद्रे” -(Equal Opportunity Centre) स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात त्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!