सावनेर – स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे जागतिक जैवविविधता दिन – २०२२ आणि भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष या निमित्याने महाराष्ट्र राज्य स्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भूतलावरील जैवविविधता, महत्व आणि त्याच्या संरक्षण विषयी जागृती निर्माण व्हावी या विशेष हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन विभागप्रमुख आणि उपक्रम समन्वयक प्रा. डॉ. विलास डोईफोडे यांनी केले.
राज्यातील जवळपास २६ महाविद्यालयातील सहाशे च्या वर विद्यार्थ्यांनी सकारात्मक सहभाग नोंदविला. यात विज्ञान, मानव्यशास्त्र, अभियांत्रिकी आणि कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेचा प्रथम पुरस्कार छाया टेम्भरे, जगत महाविद्यालय गोरेगाव – गोंदिया, द्वितीय क्रमांक अक्सबानो सलमानी, भालेराव महाविद्यालय सावनेर, तृतीय क्रमांकाचा पुरस्कार एम. डब्लू. कृषी महाविद्यालय यवतमाळ चा हर्ष दीक्षित यास प्राप्त झाला.
याशिवाय खालील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार घोषित करण्यात आले. सायली राऊत – एस. एफ. एस. महाविद्यालय नागपूर, अलिशा खान – हिस्लॉप महाविद्यालय नागपूर, दुर्गा तोंडरे – शांताबाई महिला महाविद्यालय ब्रम्हपुरी – चंद्रपूर, वैदेही बावणकर – शिवाजी महाविद्यालय नागपूर, अनिकेत गभाने – मोहोता महाविद्यालय नागपूर, हर्षल रहांगडाले – झुलेलाल तंत्रशिक्षण संस्था, अलिशा शेख – ने. ही. महाविद्यालय ब्रम्हपुरी, हर्षल रोकडे – संताजी महाविद्यालय नागपूर, राजदीप राजपूत – विश्वकर्मा माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे आणि साक्षी सहारे – नूतन आदर्श महाविद्यालय उमरेड.
प्राचार्य डॉ. पराग निमिशे यांनी सर्व विजेत्या, सहभागी विद्यार्थ्यांचे आणि आयोजकांचे अभिनंदन केले. सदर आयोजनास विभागातील डॉ. प्रदीप आठवले, प्रा. चंद्रशेखर पोटोडे, प्रा. प्रवीण दुलारे आणि डॉ. प्रशांत डबरासे यांचे सहकार्य लाभले.
भालेराव महाविद्यालयात राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com