क्रीडा पार्क व डॉ. लोहिया वाचनालय प्रकल्पांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

नागपूर : इंदोरा भागातील आहुजानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा पार्क आणि अशोकनगर येथील डॉ. राममनोहर लोहिया वाचनालय पुनर्विकासाच्या कामाचा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज एका बैठकीत सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना या बांधकामाविषयी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. क्रीडा पार्कमधील जलतरण तलावात पोहण्यासाठी येणाऱ्या लोकांचा प्रवेश आणि सुरक्षेसंदर्भात काही बदल सुचवून दोन्ही प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
आहुजानगर येथील  ११ हजार ६२० चौरस मीटर आरक्षित जागेत क्रीडा पार्कचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. या बांधकामाच्या पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये खर्च करून तळमजला, संरक्षक भिंत, रनिंग ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट, व्यायाम शाळा, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल कोर्ट, खो-खो, कबड्डी ग्राउंड, इनडोअर गेम हॉल, उपहारगृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्याविषयी समाधान व्यक्त करून पालकमंत्र्यांनी दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाचा आराखडा आणि अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अशोकनगर येथे १४५८ चौरस मीटर जागेवर डॉ. राममनोहर लोहिया वाचनालयाचा पुर्नविकास करूनय निर्मिती केली जाणार आहे. या बांधकामांवर १४ कोटींचा खर्च केला जाणार आहे.
पालकमंत्र्यांनी या दोन्ही प्रकल्पांच्या बांधकाम आराखड्याचे सादरीकरण बघून महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी आर. जाणारं विमला, मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक पिशवीचा वापर करण्यावर कारवाई

Mon Mar 28 , 2022
नागपूर, ता. २८ : नागपूर महानगरपालिकेने सोमवारी (ता.२८) स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आशीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली.  पथकाने आशीनगर झोन अंतर्गत कमाल बाजार येथील राजपुत रेस्टॉरेन्ट या रेस्टॉरेन्टवर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.           उपद्रव शोध पथकाने सोमवारी ०१ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ५  हजार रुपयांचा  दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com