क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या अनुदानात वाढ – सुनील केदार

मुंबई, दि. 21 : राज्यातील  क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता व  आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण व्हावेतयासाठी सुसज्ज,सर्व सुविधांयुक्त क्रीडा संकुले उभारण्या याकरिता क्रीडा संकुलांचे अनुदानात भरीव वाढ करण्यात आली असल्याची माहिती, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.

मंत्री केदार म्हणाले, राज्याच्या क्रीडा धोरण 2001 अंतर्गत विभागीय, जिल्हा व तालुका क्रीडा संकुल निर्माण करण्याबाबतचा निर्णय  घेण्यात आला होता.सदर क्रीडा संकुलाचे अनुदान मर्यादा ठरविली होती. त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. अनुदान मर्यादेमध्ये वाढ करून तालुका क्रीडा संकुलासाठी रू.१.०० कोटी वरून रू. ५.०० कोटीजिल्हा क्रीडा संकुलासाठी रू. ८.०० कोटी वरून रू. २५.०० कोटी आणि विभागीय क्रीडा संकुलासाठी रू. २४.०० कोटी वरून रू. ५०.०० कोटी याप्रमाणे अनुदान मर्यादा निश्चित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ही सुधारित अनुदान मर्यादायापुढे प्रशासकीय मान्यता देण्यात येणाऱ्या व बांधकाम सुरू करण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलांसाठी लागू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            ज्या क्रीडा संकुलांना यापूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली असून, बांधकाम पूर्ण झाले आहे अथवा बांधकाम सुरू आहे अशा संकुलांबाबत तालुका क्रीडा संकुल रू. ३.०० कोटीजिल्हा क्रीडा संकुल रू. १५.०० कोटी व विभागीय क्रीडा संकुल रू. ३०.०० कोटी याप्रमाणे अनुदान मर्यादा लागू राहील. हे सुधारित अनुदान अशा क्रीडा संकुलामध्ये अतिरिक्त क्रीडामुलभूत सुविधा याचे बांधकामनवीन क्रीडा उपकरणे व साहित्य तसेच उपलब्ध क्रीडा सुविधांचे अद्ययावतीकरण बळकटीकरण यासाठी अनुज्ञेय राहणार आहे.

            क्रीडा संकुलांचा वापर खेळाडूसर्वसामान्य नागरिक इत्यादींना जास्तीत जास्त करता यावा यासाठी क्रीडा संकुलेखेळाडूसर्व संबंधित व सामान्य जनतेसाठी उपलब्ध राहतील. क्रीडा संकुलांचा वापर क्लबहाऊस सारखा होणार नाही. याची दक्षता घ्यावी. क्रीडा संकुलाचा वापर करताना अधिकृत राज्य, राष्ट्रीय क्रीडा संघटनाआंतरराष्ट्रीय  क्रीडा पदक विजेते आणि स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, असे निदेशही देण्यात आले असल्याचे मंत्री केदार यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीचा अभ्यासक हरपला - उपमुख्यमंत्री अजित पवार 

Fri Jan 21 , 2022
मुंबई दि. 21 :- “ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक, राज्याच्या वाटचालीतील अर्धशतकाचा महत्वाचा साक्षीदार हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.               उपमुख्यमंत्री श्री.पवार पुढे म्हणतात, दिनकर रायकर यांची पत्रकारिता राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, जनसामान्यांना न्याय मिळवून देणारी होती. पत्रकारितेतील अर्धशतकाच्या वाटचालीत त्यांनी राज्यातील अनेक सामाजिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!