स्पेनच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट शैक्षणिक, सांस्कृतिक सहकार्य, पर्यटन वाढविण्याबाबत चर्चा

मुंबई – स्पेनचे भारतातील नवनियुक्त राजदूत जोस मारिया रिदाओ डॉमिन्गेझ यांनी सोमवारी (दि. २९) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली.

स्पेन आणि भारतामध्ये व्यापारासह शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबद्दल आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

जगभरात स्पॅनिश भाषा बोलणाऱ्यांची संख्या ५०० दशलक्ष इतकी असून भारतात देखील स्पॅनिश भाषा शिकण्याकडे युवकांचा कल वाढत असल्याचे जोस मारिया यांनी सांगितले.

स्पेनमध्ये मोठा भारतीय समुदाय असून भारतातून स्पेनमध्ये अधिक पर्यटक यावे तसेच स्पेनमधून देखील भारतात अधिक पर्यटक यावे यासाठी आपण प्रयत्न करू असे राजदूतांनी सांगितले.

महाराष्ट्रात अजंता वेरूळ लेणी यांसह अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे असून स्पॅनिश पर्यटकांना महाराष्ट्रात येऊन खचितच आनंद होईल असे राज्यपालांनी सांगितले. मात्र त्या दृष्टीने मुंबई – माद्रिद थेट विमानसेवा सुरु झाल्यास पर्यटनाला अधिक चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.

यावेळी स्पेनचे मुंबईतील वाणिज्यदूत फर्नांडो हेरेडिया  उपस्थित होते.

दिनेश दमाहे
9370868686

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

Spanish Ambassador to India calls on Governor Koshyari; calls for enhancing educational, cultural and tourism cooperation

Tue Nov 30 , 2021
Mumbai – The newly appointed Ambassador of Spain to India Jose Maria Ridao Dominguez called on Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Monday (29th Nov). The Ambassador told the Governor that Spain is keen to enhance business and economic cooperation with India while promoting more cultural, educational and tourism exchanges.  The Ambassador said there are 500 Spanish […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!