संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 15:- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या सोनेगाव राजा येथे विना नंबर असलेल्या ट्रॅकटर ने अवैधरित्या विना रॉयल्टी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांवर महसुल प्रशासनाच्या पथकाने यशस्वी कार्यवाही गतसकाळी साडे आठ दरम्यान केली असून या कार्यवाहितुन एक ब्रास अवैध वाळू जप्त करीत पुढील कार्यवाहिस्तव ट्रेकटर मौदा पोलीस स्टेशन ला लावण्यात आले.
ही यशस्वी कार्यवाही तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात परिविक्षाधीन नायब तहसीलदार राजेश माळी,तलाठी विनोद डोळस,काशिनाथ भेंडे, वाहनचालक युवराज चौधरी यांनी केली.
सोनेगाव राजा येथे अवैध वाळू वाहतुकदारावर महसूल प्रशासनाची कार्यवाही
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com