– संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने नागपूर शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी ५० ठिकाणी १०० ई-टॉयलेट्स उभारण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंगळवारी (१४ जून) हा निर्णय घेण्यात आला. ऑनलाईन माध्यमातून झालेल्या बैठकीमध्ये स्मार्ट सिटीचे मेंटॉर आणि चेअरमन डॉ संजय मुखर्जी मुंबईहुन उपस्थित होते. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी, संचालक मंडळ सदस्य अनिरुद्ध शेनवाई, आशिष मुकीम, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर आणि मुख्य वित्त अधिकारी नेहा झा उपस्थित होते. या बैठकीत शहरातील नागरिकांना स्मार्ट सिटीचा लाभ मिळण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आले.