तीन स्वास्थ निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

उपायुक्तांची झोनला आकस्मिक भेट : ६५ स्वच्छता कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात

नागपूरता२८ : नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज, गांधीबाग आणि लक्ष्मीनगरमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गैरहजर राहण्यावरून मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापक संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी तिनही झोनच्या स्वास्थ निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच विनापरवानगी आणि पूर्वसूचनेविना रजेवर असलेल्या तिनही झोनच्या एकूण ६५ स्वच्छता कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापक संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सोमवारी (२७ जून) लकडगंज झोन, शनिवारी (२५ जून) गांधीबाग झोन आणि शुक्रवारी (२४ जून) लक्ष्मीनगर झोन येथे आकस्मिक भेट दिली. लकडगंज झोन येथील प्रभाग २३ मध्ये भेट दिली असता येथील हजेरीपटावरील एकूण १७८ सफाई कर्मचाऱ्यांपैकी १३० कर्मचारी हजर आढळून आले. २८ कर्मचारी विना परवानगर गैरहजर असल्याचे दिसून आले. तर गांधीबाग झोन अंतर्गत प्रभाग २२ मधील हजेरीपटावरील एकूण १३९ सफाई कर्मचाऱ्यांपैकी ८१ कर्मचारी हजर तर २७ कर्मचारी कुठल्याही परवानगीविना गैरहजर आढळून आले. लक्ष्मीनगर झोनच्या प्रभाग ३७ मधील हजेरी पटावरील एकूण ९२ सफाई कर्मचाऱ्यांपैकी ६९ कर्मचारी हजर तर १० कर्मचारी विना परवानगी गैरहजर आढळून आले. या तिनही झोनमधील विना परवानगी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी एक दिवसाचे वेतन कपात करणे आणि हजेरी रजिस्टरची तपासणी करून गैरहजर सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या नावानिशी लेखी ताकीद देण्याबाबत झोनच्या सहायक आयुक्तांना सूचित करण्यात आले आहे.

गैरहजर कर्मचाऱ्यांवर देखरेख व नियंत्रणाची जबाबदारी स्वास्थ निरीक्षकांची आहे. तिनही झोनच्या गैरहजर सफाई कर्मचाऱ्यांच्या गैरहजरपणाबाबत स्वास्थ निरीक्षकांची जबाबदारी निश्चित करून कर्तव्यात कसून केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे. लकडगंज झोनचे वरीष्ठ स्वास्थ निरीक्षक आशिक बन्सोड, गांधीबाग झोनचे प्रभारी स्वास्थ निरीक्षक करणसिंग बेहुनिया आणि लक्ष्मीनगर झोनचे प्रभारी स्वास्थ निरीक्षक राजपाल खोब्रागडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ४८ तासाच्या आत सादर करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

१ जुलैपासून प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात धडक कारवाई

Tue Jun 28 , 2022
नागपुर – केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाद्वारे जारी अधिसूचनेनुसार सिंगल यूज प्लास्टिक साहित्याची निर्मिती, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापर यावर १ जुलै २०२२ पासून संपूर्ण नागपूर शहरात धडक कारवाई केली जाणार आहे. सर्व झोन स्तरवर उपद्रव शोध पथकाच्या जवानांद्वारे सक्तीने कारवाई करण्याचेही आयुक्तांनी बैठकीत निर्देश दिले. केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!