फर्दापूर येथील शिवस्मारक आणि भीमपार्कचे काम तात्काळ सुरु करावे – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार  

 मुंबईदि. 15  : औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्धतेसह सर्व प्रक्रिया तात्काळ पूर्ण करुन बांधकामास प्रत्यक्षात सुरूवात करण्यात यावीअसे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

            मंत्रालयात शिवस्मारक व भीम पार्क उभारण्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाणजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गटनेपर्यटन उपसंचालकऔरंगाबादचे जिल्हा क्रीड़ा अधिकारीजिल्हा समाजकल्याण अधिकारी,तहसीलदारगटविकास अधिकारीसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीनगरपालिकेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

            महसूल राज्यमंत्री श्री.सत्तार म्हणालेअजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांना देश-विदेशातून पर्यटक भेट देत असतात. या लेण्यांच्या सभोवताली सिल्लोड व सोयगाव शहराच्या परिसरात एकात्मिकरीत्या पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी अजिंठा-वेरूळ संवर्धन व विकास प्रकल्प यांची आखणी करण्यात आली.  फर्दापूर येथील ५५० एकर जमीन पर्यटन विकास महामंडळातर्फे अधिग्रहित करण्यात आली आहे.

            महाराष्ट्रात जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांचे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व आणि या लेण्यांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट देश-विदेशातील पर्यटकांसमोर मांडणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य, त्यांनी प्रजेला दिलेले न्यायअष्टप्रधानमंडळशत्रुसोबतच्या वेगवेगळ्या घटनाघडामोडी, युद्धांना मुत्सद्दीपणाने दिलेले प्रत्युत्तर, हा सर्व जीवनपट महाराजांच्या स्मारकाच्या रुपात साकारण्यात येणार आहे. स्मारकाच्या परिसरात महाराजांचा अश्वारूढ भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री श्री.सत्तार त्यांनी सांगितले.

सिल्लोड तालुका क्रीडा संकुल आणि मुलींचे वसतिगृह बांधकामास गती द्यावी

            सिल्लोड येथील तालुका क्रीडासंकुलाचा प्रस्ताव अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुक्यातील विविध व्यायामशाळेत क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे. अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन परिपूर्ण प्रस्तावना मंजूरी द्यावी.  सामाजिक न्याय विभागाचे मुलींचे वसतिगृह सिल्लोड येथे बांधण्यासाठी लागणारी जागा यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाच्या पातळीवर योग्य ती कार्यवाही करावी. त्यासंबंधीचा परिपूर्ण प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्यात यावा. सिल्लोड-सोयगावमध्ये संविधान सभागृहे बांधण्याचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत, असे निर्देशही  श्री. सत्तार यांनी यावेळी दिले.

            तालुक्यातील युवकांना व्यायामासाठी कसल्याही प्रकारच्या साहित्याची उणीव भासू नये यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही श्री.सत्तार यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

Tue Feb 15 , 2022
नागपूर, ता. १५ :  नागपूर महानगरपालिके तर्फे मंगळवारी (१५ फेब्रुवारी) रोजी ०६ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ३५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत श्यामकर व्हेंचर्स इन्फ्रा यांच्या विरूध्द रस्त्यालगत कचरा टाकल्याबद्दल आणि मेहाडिया चौक धंतोली येथील बेरर फायन्स लि. यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करून रु १०,००० च्या दंड वसूल केला.           त्याचप्रमाणे धंतोली झोन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com