कन्हान परिसरात छ. शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती थाटात साजरी

कन्हान : – परिसरात स्वराज्य संस्थापक बहुजनाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती “शिव जन्मोत्सव सोहळा विविध सामाजिक संस्था व घरोघरी विविध कार्यक्रमाने थाटात साजरी करण्यात आली.
 शहर विकास मंच द्वारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य शिवाजी  मान्यवरांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत शिव जन्मोत्सव सोहळा थाटात साजरी करण्यात आला.
       शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ ला छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमि त्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोज न शिवाजी नगर कन्हान येथे करून सौ. कल्याणी महेश शेंडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मंच मार्गदर्शक भरत सावळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व मंच पदाधि का-यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत शिव जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, उपाध्यक्ष महेंद्र साबरे, सचिव हरी ओम प्रकाश नारायण, सहसचिव सुरज वरखडे, कोषा ध्यक्ष महेश शेंडे, हर्ष पाटील, शाहरुख खान, प्रकाश कुर्वे सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.
शिवशाही ग्रुप कांद्री द्वारे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा थाटात साजरी
 शिवशाही ग्रुप कांद्री द्वारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य भव्य पाल खी यात्रा मिरवणुक काढुन शिव जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला.
           कांद्री बस स्टाप जवळ पोटभरे निवास येथे शिवशाही ग्रुप कांद्री व्दारे राजे छक्रपती शिवाजी महाराज हयाच्या प्रतिमेस बैलबंडी वर सजावट करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय,  जय जिजाऊ !! जय शिवराय !! च्या जय घोषात पालखी मिरवणुकीची  कांद्री येथुन फुलाचा वर्षाव आणि डि जे च्या गर्जात  मुले, युवक, युवती व महिला पुरूषा नाचत जय घोष  करित सुरूवात करून राष्ट्रीय महामार्गाने तारसा रोड चौक, आंबेडकर चौक, शिवाजी नगर कन्हान येथे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व अभिवादन आणि जय घोष करून परत कांद्री येथे समापन करून शिव जन्मोत्सव सोहळा थाटात साज रा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता
कुशल पोटभरे, चेतक पोटभरे, मयुर पोटभरे, दीपक ढोबळे, लेकराज पोटभरे, कुणाल देऊळकर, श्रीधर ठाकरे सह शिवशाही ग्रुप कांद्री मित्र मंडळी आणि  ग्रामस्थ नागरिक बहु संख्येने उपस्थित होऊन सहकार्य केले.
  इंदर कोळसा खदान येथे शिव जन्मोत्सव साजरा
वेकोलि इंदर खुली कोळसा खदान येथे राजे  
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य इंदर  खुली खदान येथे कामठी उपक्षेत्रीय प्रबंधक मा. श्री विनय कुमार साहेब व खदान प्रबंधक श्री उमेश चंद्रा साहेब यांच्या हस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जय घोष करित विन्रम अभिवादन करण्यात आले. उपस्थिताना प्रसाद वितरण करून शिव जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी वेकोलि इंदर खुली कोळसा खदान चे कामगार बहु संख्येने उपस्थित होते.
श्री हनुमान मंदिर टेकाडी व्दारे शिव जन्मोत्सव सोहळा साजरा
          श्री हनुमान मंदिर चौक टेकाडी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला. 
      श्री हनुमान मंदीर चौक टेकाडी येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला श्री हनुमान मंदिर टेकाडी चे अध्यक्ष पंढरीजी बाळबुधे व सचिव नत्थुजी मोहाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन आणि जय घोष करून शिव जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरपंचा सौ. मीनाक्षी बुधे, मनगटे ताई, मनोज लेकुरवाडे, सुनिल चिंचुलकर, नन्दु लेकुरवाडे, गंगाधर आकोटकर, रमेश बालपान्डे, अजित मोहाडे, हेमंत राउत, आकाश घोगरे, मनोज बोराडे, मनिश कुरडकर, सोरभ नाकतोडे, प्रविण चव्हाण, मयुर सेलोकर, मनु पावडे, हरिचन्द्रजी ठाकरे, रवीन्द्र गणोरकर, गणेश मस्के, अमित वासाडे, देवेन्द्र सेंगर, लोकेश चिचुलकर, वसंता केकतपुरे, मुलचंद सातपैसे, श्रीकांत राऊत, प्रीतम टाकलखेडे,  देवराव लेकुरवाडे आदीने पुष्प अर्पित व अभिवादन करू शिव जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास गावकरी बहु स्ख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पारडसिंगा के लिये 9 करोड रुपये की  पाणी पुरवठा योजना मंजूर ! सलील देशमुख

Mon Feb 21 , 2022
काटोल संवादाता  :- गाव की बढती लोकसंख्या येवन नयी पाणी पुरवठा योजना हेतू इस विधानसभा क्षेत्र के विधायन इन्होने प्रताव तयार कर जल जीवन  मिशन अंतर्गत पारडसिंगा ग्राम पंचायत के लिये 9 करोड रुपये की योजना मंजूर कर निविदा प्रक्रिया भी पुरी होणे की जाणकारी जि. प सदस्य सलील देशमुख इन्होने दि! इस योजना मंजुरी केबलीये महाराष्ट्र के मुख्यमंती मा. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com