संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गावरील बोरडा रोड कांद्री टोल नाका परिसरात एक मतीमंद महिला भटकुन फिरत असल्याचे पाहुन सावजी भोज नालयाचे संचालक किरण ठाकुर यांनी शिव ऑटो वाह तुक सेना कन्हान पदाधिका-यांच्या मदतीने तिचा पत्ता शोधुन जयताळा नागपुर ला तिच्या घरी सुखरूप पोह चवुन नातेवाईकाच्या स्वाधिन करून मौलिक कार्य केले.
बुधवार (दि.१४) सप्टेंबर ला रात्री ९.३० वाजता दरम्यान नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गावरील बोरडा रोड कांद्री टोल नाका परिसरात एक महिला भटकत फिरत असल्याचे दिसल्याने ठाकुर सावजी भोजनालयाचे संचालक किरण ठाकुर यांनी कन्हान येथील शिव ऑटो वाहतुक सेनेचे पदाधिकारी सावन लोंढे, प्रकाश पात्रे, महेर विंचुरकर यांचेशी संपर्क करून मतिमंद महिलेची माहिती दिल्याने शिव ऑटो वाहतुक सेनेचे पदाधिकारी चार ऑटो सह लगेच त्या मतिमंद महिलेच्या मदतीला पोहचले, तिची जेवणाची व्यवस्था करून तिला विचारपुस केली असता महिला मांगगारूडी समाजाची जयताला नागपुर येथील रहिवा सी असल्याचे कळताच सदर महिलेचा फोटो जयता ळा च्या काही परिचित लोकांकडे वॉटशाप वर पाठवि ल्याने महिलेच्या नातेवाईकांची माहिती लगेच मिळता च त्यांना संपर्क साधुन तिची माहिती दिल्यावर त्यानी सांगितले की, सत्रापुर येथे नातेवाईक असल्याची सां गितल्याने त्या मतिमंद महिलेच्या सत्रापुर च्या परिचि त महिलेच्या मदतीने जयताळा नागपुर ला तिच्या घरी नातेवाईकांकडे सुखरूप शिव वाहतुक सेनेच्या पदाधि का-यांनी आपल्या ऑटोने रात्री ११.३० वाजता निशु ल्क पोहचुन देण्यात आले. या कौतुकास्पद कार्यास किरण ठाकुर, उमेश पौनिकर, बादल लोंढे, महेर विंचुरकर, प्रकाश पात्रे रोशन लोंढे, सावन लोंढे आदी नी माणुसकी जपत मदत करून मौलिक कार्य केले.