संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 9 :- कामठी तालुक्यातील वडोदा गावात आजही हुतात्म्यांची तसेच स्वातंत्र्याच्या क्रांतीची आठवण देणारे स्थळ असून सन 1942 च्या चलेजाव आंदोलनाची एक ज्वलंत प्रचिती या शहीद स्मारकातून मिळते.तसेच इंग्रज राजवटीतून देश स्वातंत्र्य होऊन स्वातंत्र्याचे 74 वर्षे लोटून गेले त्यात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या आठवणी कायम ठेवण्याचे काम वडोदा येथील शहीद स्मारक करीत असून हे शहीद स्मारक क्रांतीचे प्रतीक असल्याचे मौलिक प्रतिपादन कामठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी आज 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वातंत्र्य सेनानी चा सत्कार कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी कामठी पंचायत समिती सभापती उमेश रडके, तहसीलदार अक्षय पोयाम, आरोग्य . सहायक गट विकास अधिकारी. प्रदीप गायगोले,वडोदा ग्रा प सरपंच वनिता इंगोले व ग्रामपंचायात सदस्यगण , विस्तार अधिकारी मनीष दिघाडे, गोपीचंद कातुरे सचिव सांगोळे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास सभापती उमेश रडके यांनी वडोदा गावाचा इतिहास सांगत स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्य सेनानी यांनी स्वातंत्र्य चळवळीत घेतलेला सहभागबाबत माहिती दिली.
सदर कार्यक्रमा अंतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रा प वडोदा येथे स्वातंत्र्य सेनानी चा सत्कार करण्यात आला.