सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या ‘रेड टँकर’ उपक्रमाचा बुधवारी शुभारंभ

चंद्रपूर, ता २५ : शहर महापालिकेच्या माध्यमातून नागरी भागात पाण्याचा नियोजनबद्ध वापर करणे तसेच जलप्रदूषण रोखण्यासाठी “माझी वसुंधरा अभियाना”अंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी  रेड टँकर या अभिनव योजनेचा शुभारंभ बुधवार दिनांक २६ जानेवारी रोजी महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते होत आहे.
 
अंचलेश्वर गेट रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी नऊ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त विपीन पालीवाल तसेच पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.
 
मनपामार्फत पठाणपुरा, रहमतनगर आणि आझाद बगीचा येथे प्रक्रिया केंद्र चालविण्यात येत असून, हे पाणी मनपाच्या टँकरद्वारे ४०० रुपये प्रति टँकर, तर संबंधितांच्या टँकरला १५० रुपये प्रति टँकर देण्यात येणार आहे. शहरीकरणामुळे सांडपाण्याचा प्रश्‍न निर्माण होतो. घरात तसेच सार्वजनिक ठिकाणी निर्माण झालेले सांडपाणी थेट गटार, नाल्यात सोडले जाते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍नदेखील निर्माण होतो. याचा विचार करून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने सांडपाणी प्रक्रियेसाठी मागील काही वर्षांत भूमिगत मलनिस्सारण योजना राबविली. या योजनेतंर्गत रहमतनगर परिसरात २५ एमएलडी क्षमतेचे तर पठाणपुरा परिसरात ४५ एमएलडी, तर आझाद बगीचा येथे ५ एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र निर्माण करण्यात आले. या माध्यमातून दररोज ७५ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. प्रक्रिया केलेल्या या पाण्याचा पुनर्वापर शक्‍य आहे. हे पाणी झाडांसाठी, बांधकाम, चौक सौंदर्यीकरण, शौचालय, कारखाने आदी ठिकाणी वापरता येऊ शकते. त्यामुळे शहरातील पाणी प्रश्‍न देखील काही अंशी सुटण्यास मदत होईल.
 
घरगुती व खासगी इमारत बांधकाम आणि अन्य कामासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करुन, भूगर्भातील पाण्याचे जतन करण्यासाठी हातभार लावण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

गिरीश वालावलकर यांच्या 'एके दिवशी' पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

Tue Jan 25 , 2022
 मुंबई, दि. 25 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी डॉ. गिरीश वालावलकर यांनी लिहिलेल्या ‘एके दिवशी’ या पुस्तकाचे राजभवन, मुंबई येथे प्रकाशन झाले.             पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अभिनेते संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक अजित भुरे, मेहता प्रकाशनाचे अखिल मेहता, लेखक डॉ गिरीश वालावलकर तसेच डॉ. अलका वालावलकर प्रामुख्याने उपस्थित होते.             महाराष्ट्रात येण्यापूर्वी बंगाली भाषेत विपुल साहित्य असल्याचे आपले मत होते. परंतु महाराष्ट्रात आल्यावर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com