सातपुडा वनस्पती उद्यानाची मनपा आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर : नुकत्याच झालेल्या एका बैठकीत केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सातपुडा वनस्पती उद्यानाचे सौंदर्यीकरण व नूतनीकरणसाठी मदत  करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने बुधवारी (ता. १६) मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी सातपुडा वनस्पती उद्यानाची पाहणी केली. श्री. गडकरी यांच्या संकल्पनेने व पुढाकाराने या उद्यानाचा विकास करण्यात येणार आहे.

          यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त दिपककुमार मीना, पर्यावरणवादी डॉ. दिलीप चिंचमलातपुरे, उपायुक्त रवींद्र भेलावे, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, कृषी विद्यापीठाचे असोसिएट डीन डॉ. डी. एम. पंचभाई, कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक आणि फलोत्पादन विभागाचे प्रमुख डॉ. रमाकांत गजभिये उपस्थित होते.

          फुटाळा तलावालगत कृषी विद्यापीठाचे वनस्पती उद्यान ५८ एकरमध्ये पसरलेले आहे. या उद्यानाचा २६ एकर भाग विकसित असून उर्वरित भागाचा विकास करावयाचा आहे. उद्यानाच्या नूतनीकरणासाठी कृषिविद्यापीठाला अन्य संबंधित शासकीय विभागही मदत करीत आहेत. तसेच आयुक्तांनी डॉ दिलीप चिंचमलातपुरे यांचेकडून उद्यानात होणाऱ्या विकास कार्याबाबत माहिती जाणून घेतली. उद्यान विकासाच्या कामासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे सुद्धा मदत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.

          पर्यावरणवादी डॉ. दिलीप चिंचमलातपुरे यांनी सांगितले की, सदर वनस्पती उद्यानात विविध प्रकारचे गुलाब, लिली यासारखी फुलांची झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यात येणार आहेत. तसेच अम्युजमेंट पार्क, योग केंद्र अशा सुविधा सुद्धा असणार आहेत. यासोबतच फुटाळा तलावालगत बटरफ्लाय पार्क सुद्धा विकसित करण्याचे प्रयत्न असल्याचे डॉ. चिंचमलातपुरे यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

उद्यान देखभालीसाठी नासुप्रला निधी देऊ नका

Thu Feb 17 , 2022
महापौर दयाशंकर तिवारी  यांचे उद्यान स्थितीच्या आढावा  बैठकीत निर्देश नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासकडे असणाऱ्या मनपाच्या एकही उद्यानाची देखभाल व्यवस्थितपणे झाली नसल्यामुळे नासुप्रकडून मनपाला हस्तांतरित झालेल्या ४१ उद्यानांच्या देखभालीची निधी देऊ नका, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपाच्या उद्यान विभागाला दिले. बुधवारी (ता. १६) महापौर कार्यालयातील बैठक कक्षात नागपूर सुधार प्रन्यासकडून हस्तांतरित झालेल्या उद्यानांची स्थिती व प्रलंबित कार्याबाबत आढावा बैठक पार पडली.           बैठकीत महापौर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com